>>>> *नक्की कोण तू माझा ?
>>>> मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी
>>>> नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती.
>>>> पण आहेस तरी नक्की कोण तू माझा
>>>> अवचित या मोहक वळणावर भेटलेला.
>>>> गुंफलेस तू धागे विश्वासाचे
>>>> देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे.
>>>> केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
>>>> तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज.
>>>> पण ठाऊक आहे हे दोघांना
>>>> आवडतो आपण एकमेकांना.
>>>> घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन
>>>> नाही दुखवत भावनांना.
>>>> पाठराखण करतो एकमेकांची,
>>>> रोजच उत्सुकता संवादाची.
>>>> ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
>>>> ना दिलेय मन एकमेकांना आंदण.
>>>> पण,बोलायला लागले आहेत डोळे,
>>>> मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले.
>>>> काय आहे तुझ्या मनात,
>>>> जरा बोल तरी शब्दांत..
>>>> खुप झालाय मजेशीर हा गुंता,
>>>> व्ह्ययलाच हवा आता उलगडा.
>>>> होईल का या नात्याची उकल,
>>>> एक मात्र जरुर कर.
>>>> मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर,
>>>> कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर..
No comments:
Post a Comment