भेट पहिली सरताना..
भेटावीस तू अशी,न स्वप्नी मी पाहिले,
येताच नजरे समोर,
नयनी अश्रूच वाहिले
अंतराच्या विरहाला
क्षणात दुर लोटले,
मिठित येता जीव दोन,
जन्मासाठी एकरूपले..
बाहूत माझ्या सखे
तुला मी अलगद घेरले,
मिटता पापण्या अलगद,
ओठ तुझ्या कपाळी टेकले..
धडधड उरातली पाहूनी,
स्वर तरंगही तुषारले,
पहिल्या त्या चुंबनानी,
शरीर माझे शहारले..
नवतर भेटीचा तो क्षण,
सारे काही सुंगधात मोहरले,
स्पर्श हिंदोळ्याचे अनुभवता,
मिलनपर्व ते सुखावले..
पण..
सरता सरता भेट पहिली,
पाऊल ते तिथेच अडखळले,
वाट परतीची चालताना,
ह्रिदय तुझ्या ओंजळीत ठेवले..
No comments:
Post a Comment