Tuesday, June 15, 2010

शब्दांची भाषा

शब्दांची भाषा नक्कीच कळत असणार तुला,
म्हणून शब्दात आज मन माझे उतरवतो आहे..
कळणार का कधी भाव माझ्या मनाचे तुला ?
अबोल शब्दांनाच मी हे आज विचारतो आहे …….

शब्दांपलीकडच्या काही भावना मनामध्ये असतात,
प्रत्येकवेळी जमतेच अस नाही त्यांना शब्दांमध्ये सांगायला,
काही गोष्टी स्वतःच उलगडून घ्यायच्या असतात…
बघ अशा काही गोष्टी,माझ्या शब्दात उलगडतात का तुला …..?

पोचतील जेंव्हा तुझ्यापर्यंत शब्द माझे,
कदाचित उशीरही झाला असेल समजायला तुला,
काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतील अबोल शब्द वेडे ..
बघ त्या अबोलीच्या बोलांनी,थोडा पाझर फुटतो का तुला ….?

अभिमन्यू सरखी अवस्था माझी,चक्रव्युहात फसलो आहे तुझ्या
विरहावाचून सुटका नाही प्रेमातच लागले हे उमजायला,
सोहळा हा आयुष्याचा सये, नशिबी आहे माझ्या ….!!
बघ माझ्यासारखा विरह सखे, कधी प्रेमात भेटतो का तुला

No comments: