Monday, June 14, 2010

तूच सांग पाहू..

राया,


आमरस पुरणपोळी

भात आमटी

बेत मी आखला

का ?

तुला कसं सांगू ?



खिशाला वाकुल्या दाखवणारा

श्रीमंत हापूस

तू बाजारातून आणला

का ?

ते नको सांगू..



पण,

हिरव्याकंच कैरीत

जीव माझा अडकला

का ?

तूच सांग पाहू..

No comments: