गतजन्मी जी माझी होती
तिला शोधायला
मी स्वप्नांच्या अंधुक वाटेवर निघालो
एका निर्जन रस्त्यावरच्या कोपर्यावर तिचे घर होते
कातरवेळचा वारा वाहत होता
तिचा पाळीव मोर डुलकी काढत होता
अन कबुतरं एका कोपर्यात शांत बसली होती
दारात दिवा घेऊन ती माझ्यासमोर उभी ठाकली
आपल्या टपोर्या डोळ्यांनी माझा चेहरा न्याहाळत ती म्हणाली,
दोस्ता,ठीक आहेस ना ?
मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला
कधीकाळी ज्या भाषेत आम्ही एकमेकांशी संवाद साधायचो ती विस्मृतीत गेली होती
खुप विचार करुनही मला आमची नावं आठवेनात
डबडबलेल्या डोळ्यांनी तिने उजवा हात माझ्यापुढे केला
तिचा हात हातात घेऊन मी शांत उभा राहिलो
आणि,
कातरवेळच्या वार्यात दिवा फडफडत विझून गेला
विझून गेला
No comments:
Post a Comment