त्या वळणावरची स्वप्नपरी
आयुष्यात अनेक क्षण येतात...या क्षणांत काही क्षण वेगळे असतात ...कधी त्या छोट्याश्या क्षणातही आपण अख्ख आयुष्य जगुन जातो...
तर कधी याच क्षणात आपण अख्ख आयुष्यच जणु हरवुन बसतो...
त्या वळणावरची स्वप्नपरी
रस्त्यावरच्या त्या वळणावर
तिची नी माझी भेट जाहली.
कष्ट न केले बघण्याचे
पण काहीतरी ती चोरुन गेली !
मिटल्या डोळी स्वरुप न्यहाळत
मनोमनी मी तिला वाहीली
स्वप्नांचेहे स्वप्न पाहत
स्वप्नपरी ही मला गवसली !
दुसऱ्यादिवशी त्या वळणावर
खुप तिची मी वाट बघितली
रात्रीचा तो समय होता
स्वारी माझी घरी परतली !
अनेकदा मग त्या वळणावर
स्वारी आमची फिरु लागली
अधीर तिच्या भेटीला मी
परत तिला ना कधी पाहिली !
एकेदिवशी त्या वळणावर
गाडी मध्ये तिला बघितली
स्वप्नाला वळणावर सोडत
स्वप्नपरी ती दुर निघाली !
आड होता त्या वळणावर
सत्याची ति जाणीव झाली
भेट मिळाली भेटीची त्या
नशिबाने ठोकर मारली !
No comments:
Post a Comment