Monday, September 8, 2014

गणपती निघाले दु:खात । भक्तगण नाचत-गात सुखात ।।

विचार करा । पटले तर घ्या ।।
नाहीतर एका डोळ्याने वाचा । अऩ दुसर्याने सोडून द्या ।
आज गणपती बाप्पाचे विसर्जन पाहण्यास गेलो होतो वाटले काही सुंदर छायाचित्रे काढेन...
सोबत छायाचित्रक मीत्रांचा लवाजमा होताच...
पण एक गोष्ट विलक्षण वाटली व खटकली सुद्धा ...

गणपती निघाले दुःखात । सारे भक्तगण नाचत गात ।।
त्यातपण गणपती मागे साठ जण । आणी नाचायला आठ जण ।।
त्यातले चार आठ जण तर फुलं तराठ । तरीपण आवाज मात्र जसे पाताळ-अंतराळ गाठ ।।
गणपती झाले लालेलाल । भक्तगण झाले झुलेलाल ।।

मला एक प्रश्न पडला माणूस म्रुत्यू पावतो तेव्हा असे नाचत गात का नाहीत.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
गणेश आगमनाची मिरवणूक थाटात नक्कीच करा पण विसर्जन फक्त टाळ व गणेश नामजपात करा.
हे माझी सर्व भक्त गणांन्ना नम्र विनंती आहे.
हे माझे वैयक्तिक मत आहे, मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत.
-- प्रितम साळवी

Friday, September 5, 2014

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरलो नाही मी
तळव्यावरची  जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?

ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Thursday, September 4, 2014

गणपती वर पोवाडा

क्रांतीबा फुले यांचा गणपती वर पोवाडा वाचा आणि आपल्या बहुजन बांधवांच्या कल्याणार्थ शेयर करा......

"पशुपरी सोंड पोर मानवाचे !! सोंग गनोबाचे नोंद ग्रंथी !!
बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड !! फुकितो शेंबूड सोंडेतून !!
अन्तेजासी दूर, भटा लाडू देतो !! नाकाने सोलीतो कांदे गणू !!
चिखला तुडवूनी बनविला मोरया !! केला ढबू -ढेर्या भाद्रपदी !!
गनोबाची पूजा भाविका दावितो !! हरामाच्या खाती तूप- पोळ्या !!
जय मंगलमुर्ती जय मंगलमुर्ती !! गाती नित्य कीर्ती टाळ्यासह !!
उत्सवाच्या नावे द्रवे भोन्दाडती !! वाटी खिरापती धूर्त भट !!
जाती मारवाडी गरीब नाडीती !! देवूळ बांधती कीर्तीसाठी !!
देवाजीच्या नावे जगाला पीडिती !! अधोगती जाती निश्चयाने !!
खरे देव भक़्त देह कष्टविती !! पोषण करिती घरच्यांचे !!
अजाणसी ज्ञान पांगळ्या अन्नदान !! हेच बा स्मरण निर्मिकाचे !!
भोळा वारकरी त्यास दिली हूल !! स्मरणांत फळ आहे म्हणे !!
क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास !! गांठी शिवाजीस !!
मतलबी दादू कोंडदेव त्या ठेवी अविद्वान !! करवी तुलादान एदि भटा !!
स्वजातीसाठी बोधिले पाखंड !! धर्मखंड खरे जोती म्हणे !!...

आभार : फुले समग्र वाड्मय पृ. क्र. ४७१. -महाराष्ट्र शासन प्रत.