प्रेमाचा तो मौसम होता
रान गजबजलेले सारे,
वारा आला, फांदी तुटली
अवचित विपरीत घडले रे!!!
दोन पक्षी भिन्न जातीचे
प्रेमात पार बुडाले, वेडे,
जिवंत असता या जन्मी
कधी न त्यांची भेट घडे!!!
एके दिवशी भेट घडता
वैरी झाला समाज त्यांचा,
करुन वार चोचीचे त्यांना
जीव घेतला त्या दोघांचा!!!
कळले प्रेम कुणास न त्यांचे
देवही तेव्हा जागा झाला,
बघुन हा प्रकार सारा
देवाचाही अश्रू सांडला!!!
मरता मरता वचन दिले
त्या दोघांनी एकमेकांना,
या जन्मी तर जमले नाही
पुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!
त्या दोघांचा आत्मा तेव्हा
अनंतात त्या विलीन झाला,
भेटीसाठी मग वेड्यांनी
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!
No comments:
Post a Comment