“पहिला पाऊस पहिली आठवण
पहिल्या सरीचे पहिले स्पंदन”
पावसातली तू ,चिंब ओले अंग
कांती शहारे, नभी इंद्रधनुचे रंग
तव गंधाने मोहरले हे अंगण ….१
लाजून चूर झाले वस्त्र तुझे तंग
भिजलेले सौंदर्य पाहून मी दंग
भिजलेस तू पण जळते माझे मन ….२
केस ते ओले नयनी नवी उमंग
ओठ गुलाबी चुंबी मनीचा विहंग
बरसून प्रीत तू सजवलेस हे क्षण …..३
स्पर्शाने ओठांच्या उमटले नवे तरंग
ऋतूत ओल्या सुटो कधी ना संग
तुझ्या माझ्या प्रीतीचा पहिलाच हा सन ….४
“पहिला पाऊस पहिली आठवण
पहिल्या सरीचे पहिले स्पंदन “
No comments:
Post a Comment