मनात आज माझ्या वेगळीच हुरहूर होती
गर्दीतल्या त्या डोळ्यांना नजर शोधत होती……
काळजात अचानक वेगळेच काहूर माजले होते
हृदयाचे ठोकेही एकदमच वाढले होते ……
धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे मन निसटले होते
नजरेचे तीर जेंव्हा एकमेकांना भिडले होते …..
उद्रेक भावनांचा शब्दात सांगणे कठीण होते
नजरेनेच सगळ सांगण्याचे प्रयत्न झाले होते ….
समजले तिला माझे किती ते मला ठाऊक नव्हते
तिचे डोळे मात्र सर्व काही बोलून गेले होते ……
क्षण मात्राची नजर भेट आता सरली होती
गर्दीत आता ती दिसेनाशी झाली होती ….
परत मनांत माझ्या वेगळीच हुरहूर होती
दिसतील कधी ते डोळे परत याचीच मनांत सल होती ….!!
No comments:
Post a Comment