Majhiya Manat
Tuesday, June 15, 2010
प्रेमासाठी वेचलेले मी…
प्रेमासाठी वेचलेले मी
,
या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .
उडाली पाखरे घरट्यातुनि
,
साद घालती भविष्याला
मनी सतत तिच्याच आठवणी
,
दोष का वेड्या मनाला
?
ओढ कसली तरी अनामिक
,
आठवणींच्या रेशमी धाग्यांना
………..
१
भेटली अशीच ती पर्वानंतर
,
वाचा फुटली नजरेला
वेचला होता मकरंद आपण एकाच प्रेम-फुलातला
चोरुनी नजरा तिने दिली कबुली
,
हवास तूच या डोळ्यांना !!
……..
२
शब्दही सुचले सूरही जुळले
,
गावे कसे या गीताला
?
व्यक्त करावे प्रेम कसे
?
उत्तर नसते या कोड्याला
अडखळली परत ही वाचा म्हणून
,
कवितेत उतरविले शब्दांना
………..
३
प्रेमासाठी वेचलेले मी
,
या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .
==============================
====
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment