पावसाच्या हलक्या सरी वेड्यासारखा झेलत होतो
तुझ्या आठवणींच्या पावसात मी चिंब भिजत होतो ……
पाना-फुला-वेलीं वरून पावसाचे थेंब सहज विरघळत होते
आभास तुझ्या अस्तित्वाचे सतत मला छळत होते….
एकटाच भिजतो पावसात जेंव्हा, लोकांमध्ये हसूच होते
दिसत नसले कोणाला जरी, डोळ्यात माझ्या आसुच होते……
वर्षभरात ऋतूही तीनदा कूस बदलत असतात
तुझ्या आठवणींच्या सरी मात्र, रोजच का ग बरसत असतात…….. ?
एक नव्हे अनेक प्रश्न पावसासोबत जन्म घेतात
उत्तर तुझ्याकडेच असते,प्रश्न मात्र मलाच का ग घेरतात ….?
सांग किती दिवस एकटाच मी असाच झुरत राहणार
तुझ्या-विनाच श्रावण धारा, किती दिवस ग झेलत राहणार ……?
.
.
.
शपथ माझ्या प्रेमाची तुला , एवढंसं दान देशील का ……
आसवांनी भिजलेल्या प्रश्नांचे माझ्या, कधीतरी उत्तर देशील का
No comments:
Post a Comment