Tuesday, August 20, 2013

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

राखी बांधून हातात
बहिण ओवळे भावाला..
भरून साखर तोंडात
जीव लावेल भावाला...
निराळ्या मायेचा झरा
कायम असाच भरलेला..
वाहत राहो निखळपणे
शुभेच्छा बहिण-भावाला...!!!
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! —

Monday, August 19, 2013

सर्व काही तुझच असुदे...

जर कोणाचा हात माझ्या हातात असेल,
तर तो तुझा असेल. . . .
जर मी कोणाच्या साथी साठी जगेल,
तर ती साथ तुझी असेल.. . .
माझ नाव जोडायचंच असेल कोणाशी
तर, ते फक्त तुझ नाव असाव. . .. . .
माझ्या या डोळ्यांनी स्वप्न
तर खूप बघितली. . . .
पण जर कुठल स्वप्न खर ठरायच असेल,
तर ते तुझे असु देत. .♥♥

Monday, August 12, 2013

प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी...

प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी...

लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणे फुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणं तसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय.? ते जमतं तुम्हाला.? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.!

१) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचं एक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यात जितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल.

२) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या माणसाबद्दल आपण पझेसिव्ह होत जातो. पण सतत एखाद्या माणसाला गृहीत धरलं गेलं तर त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते.

३) प्रेमात पडलो आहोत म्हणजे सतत गोड-गोडचं बोलू, असं काही होत नाही. समोरच्यानं आपल्यापेक्षा निराळं मत मांडलं तरी ते ऐकण्याची, समजून घेण्याची आणि आपल्या मतापेक्षा ते अधिक योग्य असल्याचं लक्षात आलं तर अमलात आणण्याची तयारी असली पाहिजे. अनेकदा होतं काय की मत ऐकून घेतलं जातं; पण निराळं असेल तर त्यावर भांडणं होतात.

४) सतत ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही तरी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी आहे हे आपल्या कृतीतून व्यक्त झालंच पाहिजे. एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एसेमेस किंवा भेट झाल्यानंतर मोकळं हास्य यातूनही ही गोष्ट व्यक्त होऊ शकते. प्रेम आहे पण दाखवायचं नाही, अशी काही जणांना सवय असते.

५) अनेकदा पझेसिव्हनेस इतका वाढतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या इमेल आणि सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मागितले जातात. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर पासवर्ड मागू नका. आपण प्रेमात पडलो म्हणजे आपली आयुष्य एक झाली असं होत नाही.

६) अनेक प्रेमप्रकरणे मोडतात ती इगोमुळे. त्यामुळे रागवा, भांडा अगदी अबोले धरा पण शेवटी सारं विसरून एक व्हा. तरंच नातं निभावणं सोपं जाईल.

७) प्रेम आहे म्हटल्यावर एकमेकांची ओढ वाटणार. पण प्रेम आहे म्हणजे शरीरसंबंध झालाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे जवळीक असली तरी त्यापुढे जाऊन शरीरानं एकत्र येण्याचं शक्यतो टाळा.

८) प्रेमात पडला आहात म्हणजे आता मिठी मारलीच पाहिजे, चुंबन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्या जोडीदाराची याबद्दलची मतं समजून न घेता स्वतच्या भावना त्याच्यावर लादण्याची चूक करू नका.

९) तुम्ही एकत्र फिरलात की चार लोकांना त्याबद्दल समजणार. चर्चा होणार. गॉसिपही होणार. पण आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून आहे त्या निर्णयावर ठाम राहा. मात्र, आपलं प्रेम बदनाम होईल असं चारचौघात वावरणं म्हणजे स्वातंत्र्य आहे.

१0) भटका, सिनेमे टाका, पावसात चिंब भिजा, लाँग ड्राईव्ह वर जा..मज्जा करा. पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून, नाहीतर आपली शोभा व्हायची समाजात.

११) एकमेकांची आर्थिक स्थिती समजून घेणं जरुरीचं आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही एकाच आर्थिक गटातले असाल असं नाही. एकमेकांना आर्थिक गटावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डिवचू नका. महागडी गिफ्टस्, शॉपिंग, डिस्को आणि तत्सम गोष्टींसाठी जोडीदाराने पैसा पुरवावा अशी अपेक्षा का करायची.? विशेषत मुली. गिफ्ट म्हणजे प्रेम नव्हे.

१२) जे करायचं ते मदमुराद. मोकळेपणानं. दिलखुलासपणे करा, पण कमिटमेण्ट पाळा. प्रेम म्हणजे जबाबदारी, तो स्वीकारता यायला हवी.
Like  माझिया मनात On Facebook.
 

Saturday, August 10, 2013

एका आईची भावना............

एका आईची भावना............

"लग्न झाल्यावर वडील आपल्या मुलीला भावपूर्ण निरोप देतात ह्या वर सर्वानीच बर्याच कविता व गाणी लिहिली आहेत ...

पण एक आई आपल्या मुलाला सुनेच्या ताब्यात देते ह्यावर कधी कोण काही लिहित नाही , चला तर मग वाचूयात " मुलाला सुनेच्या ताब्यात देतानाची एका आईची भावना " ...


आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे

त्याला गोड जास्त आवडत नाही ........... हे लक्षात ठेव,
थंडीत नेहमी आजारी पडतो ......... एक स्वेटर विणून ठेव

कधी कधी खूप रागावतो .......... प्रेमाने विचारले तर रडू लागतो

रागात त्याला गाडी चालवून देऊ नकोस ....... पावसात त्याला भिजू देऊ नकोस

लांब गेलात कुठे तर ..... त्याचा हाथ धरून ठेव,
तुला वेळ नाही दिली तरी ....... त्याच्याशी साथ कायम ठेव

त्याला माझी आठवण आली ...... तर तूच असशील एकमेव,
चुंबन घेऊन त्याला ...... मिठीत सामावून ठेव

आज पासून तू आलीस त्याच्या आयुष्यात ......... त्याला सांभाळून घे,
माझी आठवण नको आणून देऊस .......... एवढ त्याला प्रेम दे.......
Poem- Sushil. Admin- P2.
Like माझिया मनात On Fecebook 

श्रावण मासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात हिरवे, क्षणात पिवळे, क्षणात फिरुनी उन पड़े
वरती बघता इन्द्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपि कुणी भासे
श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा
- प्रितम साळवी
Like माझिया मनात On Facebook 

Thursday, August 8, 2013

मैत्री तुझी माझी.....

मैत्री तुझी माझी.....
आहे आपल्या मनाला पटणारी
नाही जन्मों जन्मीं तुटणारी
कधी हसणारी 
कधी रुसणारी
आठवणींच्या ओघात एकमेकां सावरणारी
अंधाऱ्या आयुष्याला प्रकाश देणारी
सुंदर भविष्याचा वेध घेणारी
आहेच मैत्री आपली खरी......

मैत्री तुझी माझी.....
आहे निखळ आरश्यासारखी
माझ्यात तुला पाहणारी
नाही ती सरड्यासारखी
विश्वासाचा रंग बदलणारी
पावसात अश्रु पाझरणारी
दुःखांचे डोंगर पेलणारी
ऊन्हात चटके झेलणारी
आहेच मैत्री आपली खरी......

मैत्री तुझी माझी......
किर्तीरुपी जगणारी
मरुन पण उरणारी
सात समुद्र जिंकणारी
विरहात तुझ्या वाहणारी
कधीच नाही घाबरणारी
कधीच नाही हरणारी
आपुलकी आपली जानणारी
आहेच मैत्री आपली खरी......||
-Rupali
 
 

 

Wednesday, August 7, 2013

का कळतच नाहि अस का होत……

का कळतच नाहि अस का होत……
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
तिचा तो मोहक चेहरा,
बिंधास्त बोलण,
हसताना खाली पहाण,
नसताणाही जवळ असण,
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
तिची ती पहिली भेट,
जगाला भीत भीत दिलेला होकार,
गोंधळलेली ती,
आणि माझ्या आनंदाचा पारावार,
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
आनंदाचे दिवस दणभर,
पालटूण येणारा दुरावा,
दूर झालेली ती,
अन गोंधलेला जीव माझा,
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
जर वरचाच बांधतो शतजन्माच्या गाठी,
मग का घड्तात या भेटी,
गोठून रहातात फ़क्त आठवणी,
का कळतच नाहि अस का होत,
मन आठवणीत तिच्या गुंतूणच रहात…… 
माझिया मनात

Friday, August 2, 2013

प्रश्न उत्तर असते नेहमी शेजारी शेजारी

प्रश्न उत्तर असते नेहमी शेजारी शेजारी
खर आहे ना ? फक्त आपले डोळे मिटलेले असतात . आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या काही छोटे निर्णय
आणि स्वतःच्या स्वभावातील छोटासा बदल ह्याने सहज सोडवता येऊ शकतात परंतु आपला अहंकार मात्र
हा बदल स्वीकारण्याचा मार्ग बंद करून टाकतो. एखाद्या प्रिय व्यक्तीशी झालेला वाद
सुद्धा काही काळानंतर अतिशय मामुली वाटू लागतो परंतु त्याच शुल्लक कारणाने आपण एखाद नात
किवा मैत्री तोडून मोकळे होतो. हे नंतरच वाटण वेदेना देणारच ठरत. तेव्हा थोड स्वतःवरती नियंत्रण ठेवलं असत
तर बर झाल असत अस वाटून जात . ह्या पश्चातापाची वेळ नक्कीच आपण टाळू शकलो असतो हे आवर्जून वाटत.खर
तर नेहमी दुसर्यावर किवा परिस्थितीवर खापर फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज असते .
पुष्कळदा आपल्या स्वभावाचा मोलाचा वाटा ह्या आपल्या एकटेपणाच्या दु:खात आहे ह्याची जाणीव होते
पण वेळ आणि व्यक्ती गेलेली असते . गेल्या काळाबरोबर काही नाती पुसली जातात पण जी आपण कधीच पुसू
शकत नाही त्या नात्यांना तोडण्याआधी त्या विषयी स्वतःला नक्की विचारून बघाव की खरच बदल कुठे
गरजेचा आहे ? जर तो स्वभावात असेल तर तो करावा जर एखाद्या छोट्या निर्णयाने हे नात वाचू शकत असेल
तर तेही करून बघाव. पुढे जाऊन आपल माणूस गमावण्यापेक्षा थोडासा बदल करून नात जपण हे केव्हाही चांगल….
मिनल
Admin-*P2*
माझिया मनात

Like This Post on Facebook 

अपेक्षांच ओझ

नवर्या साठी न बायको साठी…
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी सुंदर कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव
कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.
तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे”
तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”
“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ”
“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”
“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट”
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून
दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।
“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”
“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”
“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?”
-कवी अज्ञात
Admin - *P2*
माझिया मनात

Like This Post on Facebook

कवितांना बहार

खुप दिवस झालेत
कविताच सुचत नाहीत
खुप वाटतेय पण
शब्दच जुळत नाहीत
पण आता वाटतेय जुळतील
मनातल्या भावना आता
कागदावर उतरतील
कारण आहे ती
तिच्याच साऱ्या कविता
मी तर फक्त माध्यम
तीच कर्ता करविता
तिचा फक्त miscall
माझ्या कवितेचा आधार
आज आला तिचा call
आता येईल माझ्या
कवितांना बहार
कवितांना बहार.
माझिया मनात - P2

Like This Post On Facebook 

खरच तू छान आहे…!

खरच तू छान आहे…!

फोटोतली तू छान आहे
खरी अधिक छान आहे
खोटे तर मुळीच नाही
हे मनापासूनचे आहे …
डोळ्यात पहा चित्र तुझे
खरच तू छान आहे ………!

कौतुक करण्या सदाच
शब्द अपुरे ते पडती
ज्याच्या साठी ते असती
त्याला फुलापरी वाटती
तुझ्यासाठी शब्दफुले आहे
खरच तू छान आहे.… ……।

डोळ्यांनी पाहशी जेजे
खरेच नसते जराही ते
मनाला जाणवेल तुझ्या
तेवढे सारे खरे आहे
मला एक सांगायचे आहे
खरच तू छान आहे ………. … !

कविता - अरुण वि. देशपांडे - पुणे .
Admin - Pritam Salvi
माझिया मनात

Like This Post On Facebook 

Tuesday, July 23, 2013

तुझी आठवण आली की

तुझी आठवण आली की,
मला माझीचं रे खुप चिड येते,
तुझी आठवण आली की,
मन माझे नकळत गहीवरुन जाते.....
तुझी आठवण आली की,
अचानक पापणीला पाझर फुटते,
तुझी आठवण आली की,
रोजचं तुझ्यासाठी मनातून झूरते.....
तुझी आठवण आली की,
ईकडे तिकडे तुला वेड्यासारखं शोधत फिरते,
तुझी आठवण आली की,
मन माझे नकळत एकांतात जाते.....
तुझी आठवण आली की,
गोड क्षणांना आठवून हसत असते,
तुझी आठवण आली की,
तुझ्याशिवाय आयुष्य नकोसे वाटते.....
तुझी आठवण आली की,
स्वःताला संपवण्याचा प्रयत्न करते,
तुझी आठवण आली की,
पुन्हा नकळत तुझ्या प्रेमात पडते.....
तुझी आठवण आली की,
तु दिलेले खोटे वचन आठवते,
तुझी आठवण आली की,
का केले मी खरे प्रेम यावर पसतावते.....
तुझी आठवण आली की,
खरचं रे खुप मन माझे दुःखते,
तुझी आठवण आली की,
मला आजही रडायला येते.....
मला आजही रडायला येते.....
- सुरेश सोनावणे.....
पोस्ट - प्रितम साळवी

Thursday, July 18, 2013

तर सांग मला....

ओठांनी - ओठांशी
बोलून तर बघ ,...
अमृत नाही
पाझरले तर सांग मला....
.
.
श्वासांनी - श्वासांना
झेलून तर बघ ,...
कस्तुरी नही
उधळली तर सांग मला....
.
.
डोळ्यांनी - डोळ्यांशी
बोलून तर बघ ,...
प्रेमात नाही
पडलीस तर सांग मला....
.
.
मनानेच - मनाला
स्पर्श करुन बघ ,...
माझ्यात नाही
सामावलीस तर सांग मला.... ♥

एक गोड स्वप्नं.......!

अजून एक गोड स्वप्नं.......!
आजकाल अस वाटतय आयुष्य स्वप्नातच जगतेय
कारण,
आजकाल प्रत्येक रात्र तुझी स्वप्न घेऊन येतेय
आणि प्रत्येक स्वप्न तुझ प्रेम पांघरून जातेय
काल ना तुफान पाऊस आला
नेहमीप्रमाणे मला आवडतो तसा
धुंद वारा, गुलाबी हवा आणि
थंडीत बरसणाऱ्या अवखळ सरी
सगळं जग आपलंचं मग स्वर्गाच्याही परी
पाऊस आला की मग काही बोलावंच लागतं नाही
जवळ यायला मग बहाणाही लागतं नाही
पण नेहमी अस होत तू
जवळ घेतलंस की तेव्हाच जाग येते
मग, मात्र मन भलतंच माझ्यावर चिडत
कधी मन हसतं, कधी रडतं
मनात असंच विचित्र काहीस घडतं
आजकाल जगाशी काही नातच नाही उरल
काय सांगू वेड या स्वप्नानच
कधी कधी तर स्वप्नातही स्वप्न पडतं
लेखिका-रश्मी नगरकर
पोस्ट-प्रितम साळवी

अशी प्रीत आपली

रेशमी बंध्नाना
पुन्हा एकदा विणावंस
वाटतंय
पुन्हा तुझ्या प्रेमात
पडावंस वाटतंय
””””””””””””””””””
पाउस माझ्या मनाच्या
दोड्यत राहतो
कधि असस वाहतो
कधी लपून राहतो
*************
फूलांचा सुगंध
चंद्राची चान्द्न्ही
मंद मंद वारे
स्वपनाची रागिणी
अशी प्रीत आपली
************

सांग ना मज वेड का लावले ….

गुणदोष ठेवा सावरुनी
द्या प्रेमभाव बहरूनी
सरते आयुष्य शेवटी
राही मनी प्रीत उरूनी ..
तुझासंग प्रीतीची पाऊले
सांग ना मज वेड का लावले ….

काटेरी आठवण तरी
मनी सदैव ती परी
एकटा जीव हुंडाळी
नेत्री काळोख जरी ....
रवि नयनात मावळे
सांग ना मज वेड का लावले ….

मनी कळीही फुलली
तिथ रात दिन डुलली
वाट काढली त्यातुनि
जरी होती काट्यातुनि ……
तिथ प्रेमफुल फुलले
सांग ना मज वेड का लावले ….

किती तुझे बहाणे
माझ्या प्रीतीचे तराणे
गुलाबही लागला कराया
गुलाबी ओठाचे गाऱ्हाणे …
त्यालाही बेरंगी वाटले
सांग ना मज वेड का लावले ….
मज वेड का लावले ….
तुझासंग प्रीतीची पाऊले
सांग ना मज वेड का लावले ….

तुझ्यात काहीतरी खास

तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
डोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं
उगीच असं घडत नाही
तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
तुला स्वप्नात घेतल्याशिवाय
मनही निजू शकत नाही
तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही
एक क्षणही तुझ्या आठवणीशिवाय
माझा कधीच जात नाही
तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही.........

तरीही जीव जडतातच ना .....??

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण...
तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण....
तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???
लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??
जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??
या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..पण.....
तरीही जीव जडतातच ना .....??

Wednesday, July 17, 2013

तुझा सहवास

तुझा सहवास
तुझ्या सहवासातील ते दिवस,
अजूनही मला आठवतात
कधी हसत, कधी रुसत,
जाणून बुझून तुझी आठवण करून देतात.
तुझेच विचार मनात घेऊन
जगत असते नव्या आशेने
सहवासातील ते क्षण टिपते मी स्वप्नाने
त्या स्वप्नाला जपण्यासाठीच
मला तुझा आधार हवा
म्हणूनच,.............
आयुष्यभरासाठी मला तुझा सहवास
हवा...........

म्हणूनच आयुष्यात प्रेम केल होत

आयुष्यात प्रेम केल होत, कुणालातरी आपल आयुष्यच
देऊ केल होत...
म्हणतात, प्रेम करण सोप
असत ते व्यक्त करण कठीण
असत, प्रेम पहाण सोप
असत, ते समजून घेण कठीण
असत...
आणि हेच समजून घ्यायच
होत, म्हणून, आयुष्यात प्रेम केल होत, कुणालातरी आपल
आयुष्यच देऊ केल होत... असतो का प्रेमात खरच
आनंद का नुसतच "I Love U"
म्हणायच असत?
विरहात त्याच्या बुडून मरायच असतकी फक्त "I
Miss U" म्हणायच असत?
हेच बघायच होत म्हणूनच आयुष्यात प्रेम केल होत,
कुणालातरी आपल आयुष्यच देऊ केल होत...
म्हणुनच त्याच्याजवळ व्यक्त करण ठरवल, आणि व्यक्तही केल
होत
पण...
त्याला "माझ तुझ्यावर
प्रेम नाही" असं
म्हणायला काहीच वाटल
नव्हत, असतात खरच
अशी माणस या जगात हे
कधी मी पाहील नव्हत...
झगडत होते त्याच्याकडून ते "I Love You" हे तीन शब्द
ऐकण्यासाठीकधी, त्याच्या आठवणीत मरत
होते, तर कधी मरुनच जगत होते... आणि कदाचित हेच
माझ्या मनाला अनुभवयाच होत... म्हणूनच आयुष्यात प्रेम केल
होत, कुणालातरी आपल
आयुष्यच देऊ केल होत...!

जगू तरी मग कोणा करिता

तू जाते म्हणतांना चुकतो हृदयचा तोल
तेव्हा कळते माझ्या मना तू किती अनमोल

तू जाता मी संपेन होईल कायमचा अबोल
मी गेल्यावर कळेल तुला मला तू किती अनमोल

सांडला जारी जीव हा तरीही सदैव तडफडेल
तूझ्या विना अस्तित्व काय धरती वा परगोल

तू म्हणतेस .....
तू म्हणतेस , सोडून देऊ तुला कुणा करिता ?
फक्त एवढच सांग मला, जगू तरी मग कोणा करिता

Saturday, June 15, 2013

Facebook hi halli bore hot challay

Roj baghato ti online ahe ka
Pan ti online yetach nahi
Rojach tichi chat window open karto
Pan kahich ping karat nahi
Rojach tichi profile check karto
kadhi kuthe kahi share kele ka
Pan ti kahich post karat nahi
kadachit tichyamule mala hi facebook band karave lagnar ki kay...!!!
ashi bhiti watayla lagli mala karan ata tichya vina Facebook hi bore hot challay yar.. :(

Friday, April 26, 2013

चमत्कारिक आडनावे


आडनाव - आपल्या नावाच्या शेवटी येणारे हे आडनाव फार चमत्कारिक असते। काहींचे त्यांच्या व्यवसायावरून तर काहींचे वर्णावरून , तर काहींच्या आडनावांना काही अर्थच नसतो. चमत्कारिक अर्थ लावलेली ही काही आडनावे....

1. Gardenner - MAALI - माळी
2. Stenographer - TIPNIS -
टिपणिस
3. Goldsmith - SONAR -
सोनार
4. Priest - PUJARI -
पुजारी
5. Sweeper - ZADE / ZADGAONKAR -
झाडे / झाडगावकर
6. Smoker - DHURI -
धुरी
7. Milkman - GAWALI -
गवळी
8. Roadside Contractor - MUKADAM -
मुकादम
9. Royal / King's Family - RAAJE -
राजे
10. Drawing Maker - CHITRE -
चित्रे
11. Umbrella Maker - CHHATRE -
छत्रे
12. Money Spender - KHARCHE -
खर्चे
13. Pot Maker - MATKARI -
मतकरी
14. Foreigner - PARDESHI -
परदेशी
15. Bakery owner - PAWGI /BUNKAR -
पावगी / बनकर
16. One with tailoring shop - SHIWDE / SHIMPI -
शिवडे / शिंपी
17. Jeweller - RATNAPARAKHI -
रत्नपारखी
18. Building constructor - AADEKAR/MAHALE -
आडेकर / महाले
19. Lamp factory Owner - DIVEKAR -
दिवेकर
20. Cotton mill owner - KAPSE /RUIKAR -
कापसे / रुईकर
21. Silver mine owner - CHANDEKAR -
चांदेकर
22. One who only takes - LELE
- लेले
23. 
One who always says 'take away' - NENE - नेने
24. Maharashtrian Bill Gates - BAL PHATAK -
बाळ फाटक
25. Maharashtrian Mouse - BAL POKHARKAR -
बाळ पोखरकर 
26. Neil Armstrong - NEELESH BHUJBAL - निलेश भुजबळ
27. One with K on his head - SHIRKE -
शिर्के
28. Narasimha Avtar - POTPHODE -
पोटफोडे
29. One with stomach problem - POTDUKHE -
पोटदुखे
30. One with weight of 100 tonnes - SOMAN -
सोमण 
31. One who is brave - WAGH /VEERKAR - वाघ / वीरकर
32. Tiger Catcher - WAGHDHARE -
वाघमारे 
33. 
Tiger Killer - WAGHMARE - वाघधरे 
34. 
With the face of Cow - GAITONDE - गायतोंडे 
35. 
From Fox family - KOLHE - कोल्हे 
36. 
From Wolf family - LANDAGE - गोडबोले 
37. 
One who is real cat - MANJAREKAR - मांजरेकर
38. One who lives in village - GAONKAR -
गावकर
39. One who only take money - DAMLE -
दामले
40. One who is untidy - GABALE -
गबाळे 
41. One who eats more - DHOLE/DHAMDHERE - ढोले / ढमढेरे
42. One who works very cool - KULKARNI -
कुलकर्णी
43. One who is coward - PULEKAR - पुळेकर
44. One who reaches the root - MULEY -
मुळे
45. One who is 1000 times more intellegent- SAHASRABUDHHE -
सहस्त्रबुद्धे
46. One who divides by 2 - NIMKAR -
निमकर
47. One who kills - MARANE -
मारणे
48. One who Sleeps a lot - ZOPE -
झोपे
49. Do die do - KARMARKAR -
करमरकर 
50. One who twists - PILGAONKAR- पिळगावकर
51. The God - DEO/DEO-kule -
देव / देवकुळे
52. Big old Rishi - MAHAMUNI -
महामुनी
53. One who always wins - JAYKAR -
जयकर 
54. One who talks a lot - MAHASHABDE - महाशब्दे
55. One who doesn't talk - GOOPCHOOP -
गुपचुप
56. Talkative - BADBADE -
बडबडे 
57. Sweet Talker - GODBOLE - सहमते 
58. One who never Listens - NAIK - नाईक 
59. One who is always on Strike - HARTALKAR - हरताळकर
60. One who always makes the job hard - HARDIKAR -
हर्डीकर
61. One who builds temples - DEVALEKAR -
देवळेकर
62. One who runs away - BHAGWAT -
भागवत 
63. One who breaks everything - KHANDEKAR -
खांडेकर
64. One who blackens everything - KAJALE -
काजळे
65. One who is father - BAPAT -
बापट
66. One who lives in Clouds - DHAGE - ढगे 
67. One who is from Leaf - PANASE - पानसे 
68. One who agrees with everyone - SAHAMATE - सहमते
69. One who always go to varanasi - KASHIKAR - काशीकर
70. One who is very sweet - GODSE -
गोडसे
71. Bitter person - KADU -
कडू 
72. Its okay - BARWE - बर्वे
73. One who thinks - VICHAARE -
विचारे
74. One who is wise - SHAHANE -
शहाणे
75. One who is close to everyone - JAWALKAR - जवळकर
76. One who is bald - TAKLE -
टकले
77. One who only thinks of curd rice - DAHIBHATHE -
दहीभाते
78. Mango man - AAMBEKAR -
आंबेकर
79. One who Eats only Carrots - GAAJARE -
गाजरे 
80. One who eats only Snake Gourd - PADVAL -
पडवळ

Colourful maharashtrians
81. - KALE -
काळे
82.- GORE -
गोरे
83. - HIRWE -
हिरवे
84. - KALBHOR -
काळभोर
85. - PIWALE -
पिवळे
86. - DHAWLE -
धवले

Some Metallic Maharashtrians
87. - PITALE -
पितळे
88. - TAMBE -
तांबे
89. - LOKHANDE -
लोखंडे
90. - SONE
 - सोने

91. One who has by hearted Vedas - VEDPATHAK -
वेदपाठक
92. One who troubles whole world - JAGTAP -
जगताप
93. One who is Mad - PISAAT -
पिसाट
94. One who divides - BHEDE -
भेदे
95. House Breaker - GHARPHODE -
घरफोडे
96. Head Breaker - DOIPHODE -
डोईफोडे
97. Bed Breaker - KHATMODE -
खातमोडे
98. Ear Breaker - KANPHODE -
कानफोडे
99. One who is always in work - KAMAT -
कामत
100. One who has five sons - PACHPUTE -
पाचपुते
101. One who has twenty sons - VISPUTE -
विसपुते


Thursday, April 25, 2013

A poem for girls. "Poem: Is it my fault???"

A poem for girls. "Poem: Is it my fault???"
I'm a girl,
Is it my fault..??
I was born as a girl,
Is it my fault..??I'm a girl..
So,am i being sexually assault...??
No one understand,what i feel,
with worries,tension you make my heart fill.
I'm a girl..
Is it my fault..??
So,am i being sexually assault...?
i worry going outside alone,
i regret being a daughter not a son.
Nobody understands me,Nobody..
At my body,boys see.
but,still it is my fault,
So,i'm being sexually assault...
Boys touch me when i'm moving on road,
riding bikes bloody dogs,
Stare at us,
every time when i'm in a train or a bus..
I'm a girl,
so i feel guilty,
They see and whistle..
Is it my fault..
So,am i being sexually assault...??
my dad says even mom,
not to go out of home...
Their are many questions,
''Why i'm a girl??''
why i can't do fashion.??
why i can't wear what i wish??
i'm a mother,
i'm a sister,
i'm a girl friend...
but no one understand what i feel..
Boys play with us like a doll,
They tease us,at night they call..
I'm a girl,
Is it my fault..
I was born as a girl,
Is it my fault..
I'm a girl..
So, am i being sexually assault...??

Monday, April 8, 2013

माझी आजी...

कविता वाचण्यासाठी छायाचित्रावर टिक् करा. आभार - लेखक/ कवी

Dil toh bachha hein ji

Kabhi kabhi dil chahta hai kuchh aisa ho jaaye…

Exam ho per result naa aaye,

Class ho per teacher naa aaye,

Bus mein baithe per office naa jaaye,

Picnic jaaye aur waapis naa aaye,

Haftein mein 3 din ho aur fir Sunday aaye,

Sote rahe din bhar, shaam ko ghoom ne jaaye,

Hum bilkun naa padhe aur paas ho jaaye,

Sab dost saath rahe aur chhuttiya manaye,

Jise chahte hai dil se, wo apna ho jaaye,

Barish mein bhige aur jor se gaaye,

Duniya ko bhul, fir bachche ban jaaye,

Bheed se dur, ek nayi duniya banaye,

Saree zindagi bas yunhi kat jaaye,

Kabhi kabhi dil chahta hai kuchh aisa ho jaaye

Lekin jo bhi  ho…thoda jaldi ho jaaye

फरक कुठे पडला आहे….

फरक कुठे पडला आहे….

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचाb फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या­ निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|