Monday, June 14, 2010

निरोप

कळी उमलत राहो हास्याची सदैव तुझ्या ओठी


दृष्ट न लागो त्यास कोणाची अतृप्त सुगंधासाठी

जलुनी-विझती लाखोवरी निखारे चिंब प्रेमवर्षावातही

थेंब एकच तव प्रीतिचा पुरे मज अखंड जळण्यासाठी

वचन एकची देतो तुला संपेल न हा बहर कधी

वेचीत राहीन शब्दसुमने मी तुला वाहण्यासाठी

अडकला श्वास माझा कि समजून घेतो एवढेच मी

मृगजळाचा थेंब तू तहानलेल्या ओठांसाठी

तोडतो आहे आज सारे रेशीमबंध आठवणींचे

निरोप घेतो तुझा मी परत कधी भेटण्यासाठी…..

No comments: