प्रस्तावना :
नैसर्गिक लाजरेपणाने प्रियकरापासून अंतर ठेवणार्या प्रेयसीला देवच अंतर देतो आणि तिच्यात व प्रियकरात अंतर निर्माण होतं..जे दूर करणं सर्वस्वी देवाच्या हातात..
** अंतर **
आपल्यातलं अंतर
वेळेआधीच
कमी होईल
ह्या भीतीने मी
रात्रंदिवस आपल्यांत अंतर ठेवायचे..
वेळेतच मग
देवाकडे आंतरपाट मागितलं
तर,
त्याने आपल्यालाच अंतर दिलं
अशी वेळ आली की,
आता..
भीती संपली
रात्र जळाली
दिवस विझले
नयन भिजले
आणि , उरलंय फक्त अंतर..
फक्त अंतर
कायमचं..
आपल्यात..
No comments:
Post a Comment