‘मराठी अस्मिता’ नावाचा जुनाच खेळ आहे
मतांच्या माशांसाठी नेत्यांचा नवा गळ आहे..
आली का मराठीची आत्ताच याद यांना
भोंगल्या राजकारणाची मनात सल आहे.!
उगा नाचविता नंग्या तलवारी कशाला ?
मनगटात अजून तुमच्या उसनेच बळ आहे !!
उगाच गाता मराठीचे उष्टे पोवाडे कशाला ?
कृतीपेक्षा बोलण्याकडेच यांचा जास्ती कल आहे ….
शून्य असले कर्तृत्व तरी लाटणार हेच श्रेय सारे
थाप असावी कौतुकाची तेथे लाठीचा जुना वळ आहे ……
=================================
No comments:
Post a Comment