एकटा का असेना तू चालत रहा
संगे कुणी येवो न येवो तू चालत रहा
तू चालत रहा
जर कुणी बोललं नाही तुझ्याशी
पाठ फिरवली सर्वांनी
घाबरुन सगळे बसले घरात
चल,तूच मनातलं बोलून टाक
एकटा का असेना तू चालत रहा
संगे कुणी येवो न येवो तू चालत रहा
तू चालत रहा
जर आले सारे माघारी,निघाले बिचकत तुझ्यापाठी
दाट अरण्यात नसेल सोबती कुणी
सांडू दे जमिनीवर रक्त तुझं,न खाता हाय
चल,तूच काट्यांच्या मैदानात ठेव पाय
एकटा का असेना तू चालत रहा
संगे कुणी येवो न येवो तू चालत रहा
तू चालत रहा
नसेल दिवा,दाटला अंधार
आले वादळ,भरले आभाळ
ध्येयदीप असेल निराश
चल,तूच जाळ छाती कर प्रकाश
एकटा का असेना तू चालत रहा
संगे कुणी येवो न येवो तू चालत रहा
तू चालत रहा
No comments:
Post a Comment