Monday, June 14, 2010

स्त्री

हे स्त्री


तू असशी कलाकॄती

पुरुषांचीही

नसे फक्त देवांची



अनंत कालापासून

बहाल केले तुज त्यांनी सौंदर्य अपुल्या ह्रदयातील

विणती तुजसाठी कवी कल्पनांचे सुवर्णजाल

रेखाटती चित्रकार तव चित्र देऊनी नूतन अमरत्व



सागर देई मोती,खाण देई सोने,वसंत देई सुमने

सजवण्या,परिधान करण्या,बनवण्या अधिक अनमोल

कुर्बान करती अपुल्या तमाम इच्छा तव यौवनावर



म्हणून असशी तू

अर्ध नारी अन अर्ध स्वप्न



हे स्त्री

तू असशी कलाकॄती

पुरुषांचीही

नसे फक्त देवांची

No comments: