Majhiya Manat
Tuesday, June 15, 2010
मी काय म्हणू ?
ओठांच्या पाकळ्या फुलताना
,
त्यांना मी काय म्हणू
?
लाघवी हास्य ते
,
गुलाबाचे फुल जणू
……..
घायाळ तुझ्या नयन तीरांनी
,
शुद्धीत कसा मी राहू
?
मादिरेच प्यालाच तो
,
शिंपल्यातील मोती जणू
………..
न्हालेल्या त्या केसांचा
,
सुगंध कसा मी घेऊ
?
पावसाळी मेघ ते
,
मोरपंखांचा पिसारा जणू
……
गालावरची खळी तुझ्या
,
नजरेत कसा या साठवू
?
सौंदर्याच्या मंदिराचा
,
सोनेरी तो कळस जणू
…..
मखमली कांती तुझी
,
रंगात कसा मी सांगू
?
बदामी तारुण्य ते
,
केवड्याचे फुल जणू
………
हरिणीची चाल तुझी
,
शब्दात कसा मी रेखू
?
सडा पारिजातकाचा मागे
,
चंद्राची तू कोर जणू
…….
मलमली तारुण्य तुझे
,
शब्दांत कसा मी बांधू
?
शब्दच रिते माझे
,
सौंदर्याचा शब्दकोष तू
………….
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment