प्रिये तुझे प्रश्नार्थक डोळे दु:खी आहेत
चंद्र जसा सागरास जाणतो तसेच तुझे डोळे मला जाणतात
माझं संपूर्ण आयुष्य मी तुझ्या डोळ्यांसमोर उलगडून ठेवलंय
काहीही न लपवता आणि हातचं काहीही न राखता
म्हणूनच..तू मला ओळखतेस
जर ते हिरा असतं तर
मी ते शंभर तुकड्यांत तोडून
एका माळेत गुंफून तुला गळ्यात घालण्यासाठी दिलं असतं
जर ते सुगंधी फुल असतं तर
मी ते खुडून तुझ्या केसांत माळलं असतं
पण ते ह्रदय आहे,माझ्या प्रिये
त्याला ना किनारा ना तळ
जरी ह्या राज्याच्या सीमा तुला ठाऊक नाहीत
तरी तू ह्याची राणी आहेस
जर हा फक्त एक सुखाचा क्षण असता तर तू तो पाहू शकली असतीस
आणि क्षणार्धात वाचूही शकली असतीस
जर ह्या फक्त वेदना असत्या तर त्या अश्रूंत विरघळून
एका शब्दातही न सांगितलेलं गुपित बनून परावर्तित झाल्या असत्या
पण हे प्रेम आहे,माझ्या लाडके
जसं प्रेमातलं सुख आणि वेदना अनंत
तसंच मागण्या आणि संपत्ती देखील
प्रेम आपल्या श्वासांच्या इतकं जवळ असतं जसं आपलं जीवन
तरीही प्रेम म्हणजे काय ?
हे आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही..कधीच नाही..
No comments:
Post a Comment