ठाऊक आहे,आज मी मावळतीचा अंधार असेल
पण उद्याला मी उगवतीचा सुर्यनारायण होणारचं
आज मी एवलूसा भिरभिरणारा पतंग असेल
पण उद्याला उत्तुंग यशाची भरारी घेणारा गरुड होणारचं
आज मी वळवाचा अवेळी बरसणारा पाऊस असेल
पण उद्याला धो-धो कोसळणारा हस्त नक्षत्राचा वरूण होणारचं
आज मी असेल आडखळणारा उंचवटा पायवाटेचा,
पण उद्या अभेद्य असा हिमालय पर्वत होणारचं..
आज मी असेल दिनरात राबंणार जनावर मुकं
पण उद्या मी गरजणारा सिंह होणारंच..
आज असेल मी एक तारा अदृष्यातला
पण उद्याला दिशादर्शक शुक्रतारा होणारचं
आज असेल मी एकटा या जगात
पण उद्याला तुम्हाला घेवून उडणारा एकीचा थवा होणारचं.. .......
No comments:
Post a Comment