आज सार गाव माझ्यावर हसत होत
प्रत्येकजण पाहून तोडं वळवत होत.
प्रेम केल ही एकच चुक होती माझी
मी काय करू प्रेम तर नकळत होत.
काल आरश्यात पाहताना बर वाटल
कोणी तरी घरात मला ओळखत होत.
कुणा दिसल्या नाहीत जखमा मझ्या
वेदनेतुन एकटं काळीज ओघळत होत.
धुर कसा विझणार आग विझली तरी
सार स्वप्नं माझ त्या धुरात जळत होत.
चुल कशी पेटवू जेव्हां पेटेनाच निखारा
मग कळाल तीच्यासाठी घरही गळत होत.
त्या प्राजक्žतासही झॊप नाही आली कधी
तेही तुझ्यासाठी रात्र भर सळसळत होत.
आजवर नव्हतो झालो नापास मी कधी,
पण पुस्तकाच एक एक पान निकळत होत.
आता हा निवंडूग जगतो एकटा वाळवटांत
काय करू भविष्य ह्या उनात तळपळत होत
No comments:
Post a Comment