Tuesday, June 1, 2010

छोटे वळण

मी आणि सर बसने प्रवास करत होतो. स्वछ सकाळ, घाटाचा रस्ता. वळणे घेत घेत आमची बस घाटाच्या माथ्यावर आली.
सरांनी मला विचारले, "तुला आजूबाजूला विस्तीर्ण परिसर दिसतो आहे का?" मी सरांकडे पाहत होकारार्थी मान हलवली.
"माहित आहे, एवढा विस्तीर्ण परिसर आपल्याला कशामुळे दिसू शकतो? सरांचा पुन्हा प्रश्न..
"आपण घाटाच्या माथ्यावर आलो आहोत ना - म्हणून दिसतो आहे." - माझे शास्त्रीय उत्तर..

सर डोळ्यांनी हसले म्हणाले - "अरे, माणसाच्या विचारांची उंचीही अशीच वाढली कि, त्याचा दृष्टीकोनही असाच विस्तीर्ण होतो !!"

निसर्गाचे विचारधन माझ्यापर्यंत पोचताना आमचा प्रवास कसा संपला कळले नाही. आयुष्याच्या प्रवासाला मात्र त्या दिवशी एक छोटे वळण मिळाले...

No comments: