Wednesday, June 30, 2010

भेट पहिली सरताना..

भेट पहिली सरताना..

भेटावीस तू अशी,
न स्वप्नी मी पाहिले,
येताच नजरे समोर,
नयनी अश्रूच वाहिले
अंतराच्या विरहाला
क्षणात दुर लोटले,
मिठित येता जीव दोन,
जन्मासाठी एकरूपले..
बाहूत माझ्या सखे
तुला मी अलगद घेरले,
मिटता पापण्या अलगद,
ओठ तुझ्या कपाळी टेकले..
धडधड उरातली पाहूनी,
स्वर तरंगही तुषारले,
पहिल्या त्या चुंबनानी,
शरीर माझे शहारले..
नवतर भेटीचा तो क्षण,
सारे काही सुंगधात मोहरले,
स्पर्श हिंदोळ्याचे अनुभवता,
मिलनपर्व ते सुखावले..
पण..
सरता सरता भेट पहिली,
पाऊल ते तिथेच अडखळले,
वाट परतीची चालताना,
ह्रिदय तुझ्या ओंजळीत ठेवले..

एक क्षण आठवणीचा

एक क्षण आठवणीचा

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

त्या वळणावरची स्वप्नपरी

त्या वळणावरची स्वप्नपरी

आयुष्यात अनेक क्षण येतात...या क्षणांत काही क्षण वेगळे असतात ...
कधी त्या छोट्याश्या क्षणातही आपण अख्ख आयुष्य जगुन जातो...
तर कधी याच क्षणात आपण अख्ख आयुष्यच जणु हरवुन बसतो...


त्या वळणावरची स्वप्नपरी

रस्त्यावरच्या त्या वळणावर
तिची नी माझी भेट जाहली.
कष्ट न केले बघण्याचे
पण काहीतरी ती चोरुन गेली !

मिटल्या डोळी स्वरुप न्यहाळत
मनोमनी मी तिला वाहीली
स्वप्नांचेहे स्वप्न पाहत
स्वप्नपरी ही मला गवसली !

दुसऱ्यादिवशी त्या वळणावर
खुप तिची मी वाट बघितली
रात्रीचा तो समय होता
स्वारी माझी घरी परतली !

अनेकदा मग त्या वळणावर
स्वारी आमची फिरु लागली
अधीर तिच्या भेटीला मी
परत तिला ना कधी पाहिली !

एकेदिवशी त्या वळणावर
गाडी मध्ये तिला बघितली
स्वप्नाला वळणावर सोडत
स्वप्नपरी ती दुर निघाली !

आड होता त्या वळणावर
सत्याची ति जाणीव झाली
भेट मिळाली भेटीची त्या
नशिबाने ठोकर मारली !

Tuesday, June 29, 2010

ऑरकुट मैत्रिण

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीचे दर दिवशी दहा तरी ....
forwarded इमेल्स यावेत
आणि दुबळ्या माझ्या ईनबाँक्समध्ये junk मेल्स भरगच्च भरावेत

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीचे दिवसाला दहा तरी
फक्त हाय... how r u.... असे scrap यावेत
आणि सकाळी क्षेमकुशल ऐकूनही पुन्हा दुपारी हाय.. how r u.. असेच विचारावे

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जीने दर दिवशी तीच्या आणि मित्रांच्याही ....
community जाँइन करायची विनंती करावी
आणि कधी माझी community जाँइन करायची मलाच request पाठवावी

अशी माझी एखादी ऑरकुट मैत्रिण असावी
जी दिवसातून दहा वेळा तरी....
chating साठी online असावी
आणि काल बोललेल्या संभाषणाची पुन्हा तीच टेप लावावी

एक मुलगी...

-- एक मुलगी...
म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...
निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..
ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

Monday, June 28, 2010

स्वप्नचित्र...

स्वप्नचित्र...


स्वप्नाळू रात्री, सहज एकदा, नदीतीरी बसले
ओढून घेता, पदर नभाचा,, एक रम्य दॄश्य दिसले
चांदणं होते, चमचमणारे, तीरावरी उतरलेले
पाण्यामधले, पोहते तारे, गालामध्ये हसलेले

आकाशीच्या पडद्यावरती, चालत होते, मन कुंचले
चंद्र सोळा चितारलेले, लख्ख दिवे लखलखले
रंगीत संगीत रेषा हलता, जरा जरासे पर हलले
फुलपाखरं, फडफडणारी, स्वप्नचित्र उमटलेले..

हिरवाईत होते, ससे गोजिरे, पांढरे कापूसवाणे
पिठूर चांदणे, माळून येता, शुभ्रतेत मी न्हाले
कुठे एकला, गात होता तो, चंदन.. गंधित गाणे
मधुर सूरांवर, सुगंधित कण, मंद मंद दरवळले

पलीकडे, त्या काठावरती, स्वप्नांची एक बाग फुले
बागेमधली, स्वप्नफुले ती, पाहताच मी फुलले
उगाच नाही, सांगत काही, स्वप्नामधे मी भुलले
चितारताना , नभावरी मी, पुन्हा पुन्हा गं रमले

निर्व्याज मैत्र

सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं
घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं


"कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं
गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं

तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं
पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं

तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं
कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं

पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….

तुझी आठवण

रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ?
खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ......

ऐकायचं असेल जर तुला कारण याचं,
सांगतो आज मी तुला अगदी खरं खरं ....

कोणाची आठवण येण्यासाठी,
आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतं

पण तू तर माझ्या ह्रदयात,
रोमारोमात पूर्णपणे भिनलेली आहेस ....
मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ?

जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेस
जर मी तुला विसरूच शकत नाही....
तर मला तुझी आठवण कशी येणार ?

म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ...
की मला तुझी आठवण येते
कारण त्या क्षणी तू मला,
थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील !

म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ...
की मला तुझी आठवण येते !!!!!!!!!

प्रेम म्हणजे काय?????????????????????????

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.
एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,
सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.
अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?
प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.
सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?
ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.
मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस.
तू अतिशय प्रेमळ आहेस
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे.
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.
प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.
प्रिये,
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.
पण आता तू बोलू शकतेस का?
नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.
पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?

सांगू शकत नाही मी तूला

"सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
शब्द-शब्द वेचून केली जरी कविता
तिला ही येणार तुझी सर || १ ||

सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
एक-एक पुस्तक लिहायला गेलो त्यावर
पाने ही अपुरी पडतील त्यासमोर || २ ||

सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
करता-करता तुझ्या सौंदर्याची तारीफ
दिवस काय रात्रीचाही मला पडतो विसर || ३ ||

सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
सकाळी-सकाळी घराबाहेर पडताना
दर्शन तुझ घेण्यासाठी होतो मी आतुर ||  ४ ||

सांगू शकत नाही मी तूला
तू आहेस तरी किती सूंदर
कधी-कधी मलाच अस वाटत
माझी लागेल तूला नजर  || ५ ||

भेटूया का?..

भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..

नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी



भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात ..

घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात



भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत ..

सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत



भेटूया का?..
गोड गोड स्वप्नात ..
त्या फुललेल्या बनात ..

हरवेन मी हरपेन मी,
पुन्हा शिरता त्या क्षणात 

तुझ्याशी बोलताना......

तुझ्याशी बोलताना,
मी तुझ्या डोळ्यात पाहतो,
फक्त मीच त्या पाण्यात नाहतो.

जेव्हा पापणी लवते,
त्याच पाणी रूपात तुझ्या ओठी येतो,
हळूच ओठ पाणीदार होतात,
मग त्याच ओठांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.

त्याचवेळी तू मला अडवतेस,
अडवताना लाजतेस,
थोडी दूर जातेस, पण नंतर हातात हात धरतेस,
मग हीच लाज माझी धिटाई बनते.

जेव्हा मी घरी जाण्यास निघतो,
तेव्हा तुझ्या चेहरयावरचे हास्याच गमावते,
मग ते परत आणण्यासाठी तुला भेटण्याचे वचन देतो,
आणि त्या क्षणाची आठवण घेऊन अश्रू सावरतो.

तीही गुलाबात दगूंन गेली

आत्ताच डोळ्यात गळून गेली
जी आठवांना विसरून गेली.
होते अश्रू नीकट काळजाच्या
डोळ्यात सारे भिजवून गेली.


मी जागुन आयुष्य काढलेले
ही रात्र झोपेत गिळून गेली.
होतो मि तीथेच समोर तीच्या
ती मान मागे वळवून गेली.


हा दोष मी आज कुणास द्यावा
दोषी मला ती ठरवून गेली.
शब्दास आता रडु आवरेना
काव्यास माझ्या रडवून गेली.


झालो मि आता निवडूंग वेडा
तीही गुलाबात दगूंन गेली.

Friday, June 25, 2010

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्शणाक्शणाला बदलतात
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात

प्रयत्न

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्शणाक्शणाला बदलतात
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात

ति परत येणार नाही.......


ति कधी परत येणार नाही...
 
दूसरी काही मला आवडत नाही
 
तिसरीचा विचार मि करत नाही
 
चौथी काही भाव देत नाही
 
पाचवी वर लाईन माराचे धाडस होत नाही
 
सहावी चा खर्च मला परवडत नाही
 
सातवी हात देखिल लाऊ देत नाही
 
आठवी ची भाषा मला कळत नाही
 
नववी चा नखरा मला सहन होत नाही
 
दहावी ला सोडायची चुक मि करणार नाही
 
कारण ति परत येणार नाही...
ति परत येणार नाही.......

!! तेव्हा आले सगळे बघायला !!

!! तेव्हा आले सगळे बघायला !!


 होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,


जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,


आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला?

Thursday, June 24, 2010

मग ती कविता आहे

तू असह्य होऊन
काहीतरी लिहिलस का?
मग ती कविता आहे

आपलेच शब्द पुन्हा वाचून
तोच क्षण पुन्हा
मनात भरून येतो का?
मग ती कविता आहे

एकदा वाचले तरी
पुन्हा पुन्हा
वाचायचा मोह होतो का?
मग ती कविता आहे

तुझी रचना तुझ्या जगण्यात
भरभरून आनंद
भरते का?
मग ती कविता आहे

कुणाला आवडो वा
न आवडो
तुझे तसेच भागते का?
मग ती कविता आहे.

लग्न


लग्न म्हणजे लग्न म्हणजे लग्न असते
दुरून राजवाडा जवळून बुरुज भग्न असते।।
लग्न म्हणजे हरवलेली छत्री असते
खूप पाऊस पडताना कधीच जवळ नसते।।

लग्न म्हणजे धार नसलेली कात्री असते,
तिची चिमटी मात्र उगीच टोचत राहते।
लग्न म्हणजे चंद्रावरचा डाग असते
वरकरणी शीतल, विवरांमध्ये आग असते।।
लग्न म्हणजे सुगरणीचा भात असते
वर कच्चा, मध्ये ठीक,जळका आत असते।
लग्न म्हणजे संपलेला रॉक असते
मधुर वयानंतरचा कॅटवॉक असते।।

लग्न म्हणजे लपवलेला खजिना असते
प्रत्यक्ष हाती चिल्लर आणा लागते।
लग्न म्हणजे पत्नीने विणलेले स्वेटर असते
नको तिथे नको तेव्हा टोचत राहते।।

लग्न म्हणजे तव्यावरची पोळी असते
ताजी बरी लागते पण लवकर शिळी होते।
लग्न म्हणजे न गजबजणारे बेट असते
कविता संपते व डिक्शनरी थेर उरते।

तरीही लग्न म्हणजे सहजीवन असते
सजा असते तरीही ती आजीवन असते।

Monday, June 21, 2010

एक घरटं बांधायचं

तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं,
आपण दोघांनीही गोळा केलेल्या गवतापासून,
तोडकं मोडकं का होईना,पण
आपला दोघांचं छानसं असं घरटं बांधायचं,

दोघानी एकाच ताटात जेवायचय,
मग थोडसं उपाशी राहून
पन सोबत जेवताना एकमेकांना भरवत,
मग मात्र पोटभर जेवायचं,
तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं........

थंडीत कूडकूडताना थोडी तूला थोडी मला
असं करत एकाच चादरीत झोपतांना,
तूझ्या प्रेमाच्या उबेत मात्र,
मला संपूर्ण आयूश्य घालवायचंय
तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं........

खूप खूप प्रेम करतांना, थोडसं तुझ्यावर रागवायचंय,
तूझा प्रेमात प्रत्येक दिवस नव्या उमेदिने जगायचंय
तूला आवडत ना म्हणून एक घरटं बांधायचं,
तोडकं मोडकं का होईना,पण
आपल्या दोघांच छानसं असं घर बांधायचंय.....

तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...

तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥



आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,

मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,

क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥








घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,

मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,

मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,

तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥४॥

मी मराठी

होतो मी शांत आजपर्यंत,
काही नाही बोलो कालपर्यंत,
पण,आजपासुन मी जिवंत असेपर्यंत,
लढणार फ़्कत............!
मराठी माणसासाठी,
हक्काने मागणार.........!
नोक-या मराठी मुलांसाठी,
लोंढे थांबवणार............!
परप्रांतियाचे आपल्या राज्यात येण्यासाठी,
हटवणार.............!
गरिबी मराठी माणसांसाठी,
असच बोलतात.............!
नेते-मंडळी सगळ्यांसाठी,
तन-मन-धन आहे..........!
माझे मराठी बांधवांसाठी,
परप्रांतियाना.............!
त्यांची जागा दाखवुन देण्यासाठी,
झाला,जन्म माझा.............!
हया मातुभुमीसाठी,
घेतला वारसा हक्क.............!
मी मातुभाषेसाठी,
आहे, माझे मराठी बांधव माझ्या पाठीशी,
जे मी बोललो........
तेच मी करणार हया महाराष्ट्रासाठी...
कारण,मी महाराष्ट्रासाठी...
आणि महाराष्ट्र माझ्यासाठी....................
...

तो..........

अबोल तुझ्या शब्दातले
बोल तो बोलून गेला
निरागस तुझ्या डोळ्यातली
 आसवे तो पुसून गेला

तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
उमटवूनी तो निघून गेला
ओठांवरचे नाजूक काहीतरी
नकळत तो खूलवून गेला

कोपर्‍यात हृदयाच्या
प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
पसरवूनी तो निघून गेला

दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
मैत्रीत तो जगून गेला
सतत तुझी काळजी करणारा
तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला.........................!!!

Sunday, June 20, 2010

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही ॥धृ.॥
भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई ॥१॥

तू कुठे आहेस गा़लिब?

गा़लिब!
मला काहीतरी झालंय…
समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत…
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला…
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं…
पण आता
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड…
आता
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं…
रात्री-बेरात्री ऊर उगाच भरून यायचा…
आता
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात.
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गा़लिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी…
आता कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत

Saturday, June 19, 2010

आयुष्य ........

प्रतीक्षा आहे मला ….. आजही त्या क्षणाची…

मी तुला समजू शकलो नाही
तुझ प्रेम ओळखू शकलो नाही,
खंत एकच वाटते की
मी तुझा होऊ शकलो नाही.

आता कासावीस होतो जीव
आणि गुदमरतो श्वास,
मनात दाटून येतो
तुझ्या असण्याचा भास.

बंदिस्त केल्यात तुझ्या आठवणी
मनाच्या एका कोपर्‍यात
पण___नेहमीच त्या
उफाळुन वर येतात
आणि मग ___??

आणि मग___
सुरू होतो एक
जीवघेणा प्रवास
एका नि:शब्द यातनेचा

तुझ्यापासून
दूर नेणार्‍या
त्या
काटेरी वाटेवरचा.

या वाटेवरच्या
प्रत्येक वळणावर
माझी पावल
अडखळतात

ज्या वळणावर
तू भेटलीस
त्या वळणाची
आठवण करून देतात.

पण एक सत्य
कटू असल तरी
मनापासून मी
ते स्विकारलय.

तुझ्या रूपाने
जणू मी
स्वतःलाच
कायमच गमावलय.

लाभेल क्षणभर
नीरव शांतता पहाटेची
प्रतीक्षा आहे मला ….. आजही त्या क्षणाची…
प्रतीक्षा आहे मला ….. आजही त्या क्षणाची…

** एक छोटीशी पणती खिडकीच्या कोप-यात.. **

** एक छोटीशी पणती खिडकीच्या कोप-यात.. **

एक छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

खोलीचा कोपरा न कोपरा उजळवणारी..

जगाचा प्रकाश पाहून
दिपणारी..
स्वत:च्या ज्योतीची धग
जपणारी..

तमाच्या गमनाने
दुखावणारी..
प्रकाशाच्या आगमनाने
सुखावणारी..

पतंगांना जीवापाड
लुभावणारी..
पतंगांच्या वेडाला
स्वीकारणारी..

वा-याच्या फुंकरींनी
लाजणारी..
वादळात अस्तित्वासाठी
झगडणारी..

पणतीखालच्या तमाने
मंदावणारी..
वातीच्या टोकावरून सूर्य
शोधणारी..

तेल संपत आलय
जाणवणारी..
म्हणून अधिकच तेजाने
प्रकाशणारी..

ती छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

मनाचा कोपरा न कोपरा उजळवत विझणारी..

दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये.. एकदा तरी चालत येशील का?

दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये.. एकदा तरी चालत येशील का?


दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये
 एकदा तरी चालत येशील का?
 जग आज वेगळे असेल तुझे
 स्पनांत तरी माझी होशील का...?

 मी आहेच असा खुळा वेडा
 तुझी सदा नुसती गंमत केली
 सगळं जग हसतयं माझ्यावर
 आज तु हि एकदा हसशील का...?

 बघ ना खेळु आपण आज
 पुन्हा तोच आपला खेळ
 अर्धा अधुरा प्रत्येक वेळी
 आज तरी पुर्ण करशील का….?

 माहित आहे मला आज सगळं
 ना खेळु शकतं ना येऊ शकतं तु
 मीच निरंतर जळता सुर्य दिवसा
 रात्रीला तरी चांदणं देशील का…?.

 वाट पाहतोय असाच वेडा बनुन
 एकदा तरी वाट चुकशील का
 आयुष्य हे असेच चालले निघुन
 पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....?
 पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....??

Thursday, June 17, 2010

एक मुलगी मला आवडली.....

हल्लीच्या या दीवसात एक मुलगी मला आवडली.....


हल्लीच्या या दीवसात एक मुलगी मला आवडली.....
काय सांगू मित्रांनो इतकी आवडली की,
जणू गुलाबाच्या देठावर काट्याच असण कींवा,
वीजेचा कडकडाट आणी प्रकाशाचं दीसण ....

मग ठरवलं माझ्या मनातील कलावंताने, तीच्यातील कलावंताला भेटायचं .
दोनी कलावंताचं अगदी पोट भरून कौतुक करायचं
इतक्यात मनात एक शंखेखोर वीचार आला !
काय ती तयार होईल यायला

यातच दीवसामागून दीवस जात होते ,
आता तर बोलणेही मुश्कीलीने होत होते
असं वाटत होत की ती वीसरली आपल्याला ...
पण हे त्या वीधात्याला मान्य नव्हत, आणी
तीच माझ्या आयुष्यात पुन्हा येण सहाजीकच होत.....

पसंद ना पसंद , आवडी नीवड़ी पुन्हा जुळू लागल्या ,
तीच्या मनातील भावना शब्दांमध्ये व्यक्त होवू लागल्या
त्याच शब्दांतून माझ्या कवीता बनू लागल्या ....
मग बोलण्यास वीषय आपणहून समोर येवू लागले
कधी महाराष्ट्राची अस्मीता तर कधी माझी कवीता ,
कधी माझ्या अपेक्षा तर कधी त्यावर तीच्या शुभेच्छा

देवाचा तो स्वर्ग गाठला!!!

प्रेमाचा तो मौसम होता
रान गजबजलेले सारे,
वारा आला, फांदी तुटली
अवचित विपरीत घडले रे!!!

दोन पक्षी भिन्‍न जातीचे
प्रेमात पार बुडाले, वेडे,
जिवंत असता या जन्मी
कधी न त्यांची भेट घडे!!!

एके दिवशी भेट घडता
वैरी झाला समाज त्यांचा,
करुन वार चोचीचे त्यांना
जीव घेतला त्या दोघांचा!!!

कळले प्रेम कुणास न त्यांचे
देवही तेव्हा जागा झाला,
बघुन हा प्रकार सारा
देवाचाही अश्रू सांडला!!!

मरता मरता वचन दिले
त्या दोघांनी एकमेकांना,
या जन्मी तर जमले नाही
पुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!

त्या दोघांचा आत्मा तेव्हा
अनंतात त्या विलीन झाला,
भेटीसाठी मग वेड्यांनी
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!

ती असावी मनात

ती असावी मनात
आणी सतत विचारात
आठवण कधी आली तर
यावी समोर क्षणात

कधी रुसणारी कोपरयात
कधी हसणारी गालात
स्वच्छन्द बागडणारी आणी कधी
मला ठेवणारी भानात

थोडी भिजणारी पावसात
कधी लाजणारी उगाच
हळवी व्हावी केव्हातरी
आणी अल्लड कधी वागण्यात

अशीच यावी आयुष्यात
होउन एक नवी पहाट
दवबिन्दुसम निरागस ती अन्
तशीच रहावी माझ्या मनात...

मी आता खुष आहे

मी आता खुष आहे


 
मी आता खुष आहे
कारण रोजच्या रोज
एक पुर्ण आयुष्य जगते
प्रत्तेक रात्री
एक नवे आयुष्य सुरु करते
फुलांच्या सेजवर
काही क्षण त्यातच रमते
पण जसजशी रात्र उलटते
तसे सुरु होतात
शापांनी बरबटलेले खेळ
मद्याच्या नशेत
वासनेच्या नजरेत
अन मग मी सुद्धा
चुरगळली जाते
पलंगवरील त्या फुलांसारखी
गंध देउन सुद्धा
पाकळी पाकळी विखुरलेली
त्यांना फ़क्त हवे असते
पुर्ण पुर्ण प्रेम
आम्ही त्याला सर्विस म्हणतो
अन ते सुद्धा ओरबडुन घेतात
पैश्याच्या बोलित मोजलेले प्रेम
पण पहाट होताच मावळते
ते आयुष्य, ते प्रेम
पण तरिसुद्धा
मी आता खुष आहे
ठरवले आहे आता
रडायचे नाही
नशीबावर कुंथायचे नाही
कारण,
प्रतिष्ठित म्हणवणार्‍या समाजात
आहे तरी आता कुठे प्रेम
असतो तो फ़क्त
एकाने दुसर्‍याशी केलेला
सौदा...............
स्वता:साठीचा........

आठवण माझी आली कधी

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.
 

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.



आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.


आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्रि घेतलेल्या शपथेचा
शब्द न  शब्द आठवून बघ.


आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत  घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश  लाटेच  वीरघळन बघ.



आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

राहून गेले..

पहायचे होते मला..
तुझ्या डोळ्यांत , माझे प्रतिबिंब..

पहायचे राहून गेले..

ऐकायचे होते मला..
तुझ्या आवाजात , माझे नाव..
ऐकायचे राहून गेले..

अनुभवायचे होते मला..
तुझ्या श्वासांत , माझे श्वास..
अनुभवायचे राहून गेले..

तुला पाहणे, तुला ऐकणे, तुला अनुभवणे....राहून गेले....

भेटीचे तर होते............ ....फक्त बहाणे ,
मजसाठी तर झाले असते ते , ’ जगणे ’..

तुझ्या डोळ्यांच्या तेजात ,
उजळले असते लक्ष दीप , माझ्या नेत्रांत
जे तेवत राहिले असते , उदास अंधा-या रस्त्यांत..

तुझ्या श्वासांच्या सुगंधात ,
फुलले असते संजीवन प्राण , माझ्या श्वासांत
जे भरत राहिले असते जीवन , श्वास रोखणा-या क्षणांत..

तुझ्या आवाजाच्या मारव्यात ,
गुंजले असते मधुर गीत , माझ्या आत्म्यात
जे देत राहिले असते साद , भग्न एकाकी आयुष्यात..

पण, पण....

एक ’ भेट ’ काय टळली..
अन ' जगायचे ' राहून गेले..

' तुझ्याबरोबर ' जगायचे राहून गेले..


जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

तुला माझी आठवण होइल

तुझ्या डोळ्यांत तेव्हा

माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होइल..
आठवणी जेव्हा माझ्या

तुला एकांतात कवताल्तिल

तुझ्याही नजारा तेव्हा

माझ्या शोधात सैरावैरा पलातिल
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील

तेव्हा तुला मी दिसेन…

त्याला शोधनार्या तुझ्या नजरेत

फ़क्त मीच असेन…..
तेव्हा तुला माझे शब्द पटतील

तुझ्याही नजरेत तेव्हा …

माझ्यासाठी आश्रू दाटतील ….
माझ्यासाठी राद्नारे ते आश्रू

तेव्हा तुझ्यावरच हसतील

कारण तुझ्या गालांवर तिप्नारे त्यांना

ते ओठ तेव्हा माझे नसतील …!!!!

Wednesday, June 16, 2010

तूच ती

हो’ म्हणालीस तर तूच ती

’नाही’ तर ’कोई और ही सही’ …

आलीस तर तुज्या सोबत

नाही तर ’कोई गम नहीं ’…
अजब-अनोखी दुनिया मजेत पाहत राहीन

आयुष्याचा गाडा तसाच ओढत नेइन …

आयुष्य सुन्दर आहे

ते आणिक सुन्दर बनवत राहीन …
कारण प्रेमात तुज्या

त्या सुखाचा स्पर्श जाला…

विसरून गेलो की

’दुखः म्हणतात कशाला ?’

च्यायला परत हिचा फोन…….,

च्यायला परत हिचा फोन…….,

च्यायला परत हिचा फोन…….,

आणि पुन्हा तेच प्रश्न,

कुठे आहेस..?, कसा आहेस..?,

काय करतोssssssय ..,?

झाली का कामं..?

कप्पाळ माझं…!,

हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,

कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,

कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,

चायला, च्यायला परत हिचा फोन…….,
कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,

’तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते…,

सारं काही सांगेल.

झालंsssssss.., रडा-रडी सुरु – , ’तू खुप बदललाय,

लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि,
इत्यादि.

अगं, ’ तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,

आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,

च्यायला परत हिचा फोन…….,

बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,

लव यू, मिस यू, —- यू आणि काय काय..,

मी आभारी आहे तुझा

मी आभारी आहे तुझा

माझ्या जीवनात येण्याबद्दल

आणि येउन पुन्हा

एकट्याला सोडून गेल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा

मला स्वप्नं दाखवल्याबद्दल

स्वप्नातुन परत

वास्तवात आणल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा

दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल

आणि पुढचा प्रवास

अर्धात सोडून गेल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा

जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल

जाता जाता याच होडीला

वादळात सोडून गेल्याबद्दल
बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीस

दुस-या कुणीही नसती

इतकी दु:खं पचवली

मी आभारी आहे तुझा

याही गोष्टीसाठी……..

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….

तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो…

स्तब्ध होऊन

तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते…

क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं

पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो

बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही

बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं

सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही

माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते

ती नाही म्हणेल याची भीती वाटते

पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं

तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?

तिच्याही एखाद्या पुस्तकात

माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

एकदातरी बघ तिला सांगुन !

बघ तिला सांगुन

कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.

कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.

कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही

असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…

शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…

म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !
किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन

तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन

राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !
किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन

पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन

“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !
किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन

बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन

एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !
रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन

आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन

मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन

म्हणूनच म्हणतो एकदातरी

बघ तिला सांगून !
तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन

मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!



निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी तू रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!


कळी कळी वेचतांना तू
फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!




तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!



असे हे किती दिवस चालायच,मुकेपणातच बोलायच
सारे संकेत कळून सुध्दा न कळल्यागत करायच
अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!



आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

माझी प्रेयसी..................

माझी  प्रेयसी   गोरी   आहे
जणू   चीकन    तंदुरी   आहे  ,
तिच्यावीषयी   काही   बोलण्याची   
मला   मात्र   चोरी   आहे  .



माझी   प्रेयसी   गोड   आहे 
हापूस   आंब्याची   फोड   आहे
नवर्याला   मुठीत    ठेवीन   अशी   
तीला   भारी   खोड   आहे  .



माझी   प्रेयसी   सोज्वळ   आहे
डोळ्यात   तिच्या    काजळ   आहे
माझ्या   वीषयी   तिच्या 
मनात   तळमळ   आहे 


माझी  प्रेयसी  भित्री  आहे
वटवट   सावित्री   आहे  .
तीचे   माझे   पटणार   नाही
ह्याची   मला   खात्री   आहे  .



माझी  प्रेयसी  मस्त   आहे
स्वभाव   तिचा   थोडस   सुस्त   आहे  .
तिच्यापेक्षा   मी   बावळट   आहे
म्हणून   ती   निर्धास्त   आहे  .



माझी  प्रेयसी   हट्टी  आहे
स्वभाव   तीचा   थोडासा   कपटी   आहे
एका   शुल्लक  कारणावरून   
कालपासून   आमची   कट्टी   आहे  . 

अजुनही आठवतयं मला

अजुनही आठवतयं मला
तो लिंबोणीच्या फांदीचा झुला
त्यावर बसून हसत म्हणायचीस..
"मुर्खा, बघतोस काय झुलव ना मला.."
अजुनही आठवतयं मला
तो तुला आवडणारा पाऊस
मला विसरून म्हणायचीस,
"पावसा, बघतोस काय चिंब भिजव ना मला.."
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारं ते फुलपाखरू
त्याकडे हात लांबवत म्हणायचीस..
"पाखरा, बघतोस काय तुझ्या पाठीवर घे ना मला"
अजुनही आठवतयं मला,तुला आवडणारं ते सोनचाफ्याच झाडं,
त्याला पाहुन लाजून म्हणायचीस..
"चाफ्या, माझ्या लग्नात तुझ्या फुलांची माळ घालीन त्याला.."
अजुनही आठवतयं मला,
तुला आवडणारा तो बर्फाचा गोळा..
तो खाताना ओठांवरून जिभ फिरवत म्हणायचीस..
"गोळावाल्या, अजुन थोडासा गोड कर ना याला"
अन आजसुद्धा तु तशीच आहे,
हे पानीपुरी खाताना पाहीलं
अन तेव्हा माझं मन खरचं,
तुझ्या त्या छकुल्या कुशीला कवटाळत राहीलं.
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही

एकदा तरी........

मौनातच अर्थ सारे …….

Tuesday, June 15, 2010

तुझ्यासाठी लिहावं......?

खास तुझ्यासाठी लिहावं असं कधी वाटलं नाही 
प्रेमाने तू जवळ करावं असं कधी वाटलं नाही 

मनातील भाव क्षणभर थबकले 
हृदयातील शब्द कागदावर ओघळले 
तुझ्या प्रीतीचे कवडसे मनावर उमटले  
तरी तुला भान हरपून पहावंसं वाटलं नाही 

काजळ रात्रीत ही प्रेम तुझे उजळले 
माझ्या अंतरीच्या काठास स्पर्शून गेले 
तुझे प्रेम माझ्या ओंजळीत भरलेले  
तरी तुला ते  हृदयात ओतावंसं वाटलं नाही 

तरी याचा खेद नाही, खंत वाटली नाही 
मी तुझ्यासाठी तडफडणं, याशिवाय आता  काही उरलं नाही …