Wednesday, July 7, 2010

आज तुझा वाढदिवस...

आज नाही विसरायच, मनात पक्क ठरवल होत
आज तुझा वाढदिवस फ़क्त, मनात रुंजी घालत होत

दांडी मारावी ऑफिसला की, लवकर घरी याव
नाहीतर नकोच विचार आता हा, सरळ तुलाच जाउन विचाराव

माटीनीचा शो बघायचा, मग लंच करायचा मस्त
पेंगुळलेल्या चेहरयाने नंतर, गरम कॉफ़ी करायची फस्त

ऐ नाहीतर अस करुया का? लॉन्ग ड्राइववर जाउया कुठतरी
धाब्यावर जेवलो नाही खुप दिवसात, तू मागे म्हणाली होतीस कधीतरी

मग ठरल तर आता, ठरला सगळा प्लान
आज काय देऊ तुला, राहिलेना कसलेच भान

तयारी सगळी केली अन, तुला भेटाया निघालो
अजुन उठली नाहीस वाटत, तुझी चाहुल घेत राहिलो

तू नव्हतीस बिछान्यावर, आणि तुझा मागमुसही लागेना
सैरभैर झालो मग, काय शोधतोय कळेना

हाताला तुझा फोटो लागला, मनात तेव्हा चरर्र झाल
पायात ना उरले त्राण, अंगातल सार बळ सरल

वर्ष होइल नाही आता, आज त्या गोष्टीला
याच दिवसान नाही का, तुझा माझा घात केला

सोडून गेलीस अशी काही, न बोलता न सांगता
जन्मान्तरिची बांधली गाठ, न सोडता न उसवता

आज असच तासनतास, बसून रहावस वाटतय
रिकाम्या जागेकडे तुझ्या, कुरवाळत पहावस वाटतय

No comments: