Saturday, July 17, 2010

आला श्रावण

ओथंबिले घनु काळे
झाली तळीही सावळी
द-या-खो-या निनादती
गुंजे ढ्गांची आरोळी.
.
.
.
कुठे सोनसळी ऊन
कुठे मिठ्ठास साऊली
झीणी-झीणी छेडी बीमं
सारी सॄष्टी मुग्धावली.
.
.
.
झाली पुसट-विरळ
लांब डोंगराची रेघ
क्षितीजाच्याही पल्याड
धरा भेटशी का मेघ ?
.
.
.
वाट एकली-दुकली
जाई शोधीत साजणं
दामिनीच्या संग-संग
सखा आला गं श्रावण.
.

No comments: