Tuesday, July 6, 2010

चेह-यावर मुखवटा लावून आयुष्य हे जगतोय..

                    चेह-यावर मुखवटा लावून आयुष्य हे जगतोय..  
उसण्या आनंदावर खोटं खोटं हसतोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..  

प्रेम काय माहित कसं असतं..? कसं दिसतं..? 
भुलून गोड शब्दांना प्रेम समजुन मिरवतोय.. 
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..  
 
बाबांची इभ्रत, समाजाची भीती
एक पोकळ नातं आयुष्यभर झेलतोय..  
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..  

वळीवाच्या पावसाला श्रावण सरी समजतोय..  
मन वेडपिसं होउन त्यात ओलचिम्ब भिजतंय..  
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय.. 

माझेच प्रश्न माझीच उत्तरं, मीच साधन मीच साध्य.. 
कळतंय सारं पण वळत मात्र काहीच नाहीये.. 
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय.. 

बंदिस्त पिंज-यालाच आकाश समजतोय..  
क्षितिज माझं त्याच्यापलिकडे आहे हे सोयिस्करपणे विसरलोय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..  

जगाला सांगतोय मी आनंदात लोळतोय..  
आत मात्र रोज़ रडतोय, कुढतोय, संपतोय..  
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय.. 

कठ्पुतळीचा खेळ आता आयुष्य हे झालंय..
जो जसा नाचवेल मी तसा नाचतोय..  
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय.. 

स्वत:लाच फसवन्याची आता सवय इतकी झालीये.. 
की आरसाही बघताना भीती मला वाटतेय..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..  

आयुष्य हे असंच जाणार, फसवणूक स्वत:ची कधीच नाही संपणार..
हातावरील रेषांच्या लांबीत सुख माझं मोजतोय..  
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय.. 
 
जगाच्या या रहाटगाडग्यात एक " सोंगाड्या ".. म्हणून जगतोय ..
आणि खरं सांगू का मी स्वत:लाच फसवतोय..  
 
पण , 

एकदा तरी मनाशी प्रामाणिक मला राहायचंय.. 
काचेसारख पारदर्शक त्याला सुद्धा करायचंय..
माझ्या हक्काचा माझ्या वाटणीचा एक श्वास मला घ्यायचाय..
एक दिवस का होईना पण स्वत:साठी जगायचंय..
आज आता ह्या क्षणापासून सुरुवात मी करतोय.. 
आणि खरं सांगू का अंतरंगी स्वर्गच अनुभवतोय..
 

No comments: