Saturday, July 17, 2010

काहीच नको मला पण

काहीच नको मला पण
साथ तुझा देशील ना
आयुष्यात मी धडपडताना
हाथ तुझा देशील ना
कही नको मला पण
समजुन मला घेशील ना
सगळे दोष देताना
विश्वास तू ठेवशील ना
काहीच नको मला पण
मला तुझा म्हणशील ना
एकटी कधी रडताना
मला जवळ घेशील ना
आणखी कही नको मला पण
माज्या बरोबर येशील ना
काळओखात मी चालताना
मी आहे म्हणशील ना
काहीच नको मला पण
सावरून मला घेशील ना
जेव्हा मला गरज असेल
माझ्यासाठी येशील ना
काहीच नको मला पण
तू माझा होशील ना
तू माझा होशील ना
नको नको म्हणता म्हणता खुप काही मागितले
एवढाच मला देशील ना ............
एवढच मला देशील ना..........

No comments: