हजारो यातना झाल्या तरी
एकदातरी खर प्रेम करुन बघावच लागत
एक दिवस माझ्या चारोळ्या भरभरुन गातील,
लोकांच्या मनात काहुर माजवतील,
शब्द कधी आनंदाने चोहीकडे नाचतील,
चारोळ्या वाचुन कुणालातरी आपले दिवस आठवतील
चारोळ्या लिहिताना शब्दांना सुरेख जोडायचे,
सगळ्या आठवनींना एकत्र करायचे,
जिवनाचे सगळ्यांना दर्शन घडवायचे,
चारओळीत आपन असच सजायचे
ऋणानुबंध होते नात्याचे,
ऋणानुबंध होते अद्रुश्य स्पर्शाचे,
ऋणानुबंध होते प्रेमाचे,
कधीहि न विसारता येणाऱ्या हरेक क्षणाचे
माझ्या श्वासात तुला मी सामावल,
चारोळ्या लिहुन प्रेम पत्र पाठवल,
आज एकांतात तुझ्या आठवणिने रडवल,
अस एका जिवाने दुसऱ्या जिवाला विसावल
पावसाच पाणी कस बेभान झालय,
नद्यांतुन कस ओसंडुन वाहतय,
बघ वाऱ्यालापण कसा वेग आलाय,
निसर्गाच्या प्रेमाचा इथे साक्षाकार झालाय
तुझ्याशिवाय कविता पूर्ण होत नाही,
तुझ्याशिवाय शब्द कधी जुळतच नाही,
तुझ्याशिवाय माझ्याकडे कोणता विषयच नाही.
No comments:
Post a Comment