Tuesday, July 13, 2010

आभास

एक होता चिमना आणि एक होती चिमणी 
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार 
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
 

वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
 

चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत  
 

रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही  मनात असू देत अशाच काहीशा भावना 
 

एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले 
  

त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
  

कानाही”  ह्याची बरीच कारणे सांगितली 
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात  नाही पटली
 

चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली 
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना 
 

चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला 
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
 

चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता 
 

चिमणीने  सुद्धा  आता हसत जगायचे ठरवले 
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले    
एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

No comments: