| पाणी-पुरी.. | ||||||||
| एक कटोरी हातात घेऊन.. | ||||||||
| त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी | ||||||||
| ती उचलून तोंडात भरायची | ||||||||
| तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं | ||||||||
| मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर | ||||||||
| कधी तोंडातून.. कधी नाकातून | ||||||||
| कानशीलाजवलून वहाणारा ओघळ घामाचा | ||||||||
| लागलेला तो ठसका जीवघेणा.. | ||||||||
| आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवी हवीशी.!! | ||||||||
| . | ||||||||
| . | ||||||||
| आयुष्यही असच काहीसं.. | ||||||||
| रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं | ||||||||
| नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची.. | ||||||||
| उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं.. | ||||||||
| ते ज्याचं त्यानेच ठरवायचं | ||||||||
| लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा | ||||||||
| आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!! | ||||||||
| . | ||||||||
| . | ||||||||
| पण .. फक्त.. | ||||||||
| "भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर.. !!!!!! सौ. अनुराधा सचिन म्हापणकर | ||||||||
Monday, July 12, 2010
पाणी-पुरी..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment