Thursday, July 8, 2010

मला तो गाव पहायचाय………..

िसरली तिचे माझे लहानपनिचे दिवस…पण मला अजुन आठवतायत…..
तिला आठवून देण्यासाठी केलेली ही कविता…………………
आठवतात ते दिवस ………………
अजुनही ते दिवस आठवतात
लहानपणी घडून गेलेले
हातात हात घालून
गावभर फिरलेले……
अजुन त्या वाटेवर
तसेच ठसे आहेत का पावलांचे ?
बघून सांग मला तू
माप बदललेल्या त्या आकारंचे ……
ती जागाही तशीच आहे का?
दुपारच्या सावलीत झोपलेली
तुझा माझा खेळ बघत
एका कुशीवर लावंदलेली……..
मी सोडून गेलो तो गाव
अणि समुद्राचा किनारा
खरच माझी वाट बघतोय का ?
भातुकलीचा पसरा …….
एक एवढस चोकलेट
तू अर्ध अर्ध करायचिस
माझा राहिलेला वाटा मात्र
आठवदाभर जपायचिस….
शाळेत जायचो ती वाट
अजुन पायात घुटामलते
पण येताना मात्र ती मला
तुझ्या सोबत सापडते ……
पहिल्या पावसाचे थेम्ब
आपण एकत्र हातावर घ्यायचो
अणि सगळा पावसाला मात्र
एकमेकांच्या घरी काढायचो…….
तो गेलेला प्रत्येक क्षण
अजूनही डोळ्यात जपून ठेवलाय
पण तुझ्या बरोबर परत एकदा
मला तो गाव पहायचाय………..

No comments: