वातावरण valentine मय असल्याने एक जुनी व-हाडी कविता परत सादर करतो..
आवडली तर शेअर करा
एक रापचिक व्यालेंटाइन ..
शाळेत होतो लहान
कॉलेजात अभ्यासच केला .
देता देता परीक्षा देवा
टाईम निंगून गेला ..
आफिसात आलो इकडे
आता काम नाई सरत..
डोस्क्यात कोड शिवाय
शिल्लक नाई उरत .
शनिवारी कपडे धुतो
रईवारी शिनेमा पायतो ..
हिरोइन हिरोले खेटली कि
मीच मुंडी खाली घालतो ..
बगीच्यात गेलो कदी
तथी खेळतात जोळ्या लावा ..
अवग्या जोळ्या पहिलेच फिक्स
आता पाहू कोणाले बावा..
बरसातीचं पाणी माया
अंगाले लय टोचते
भोकना गण्या जवा
पोरीसोबत करिझ्मावर फिरते.
बस स्टापवर उभा रायतो
वाटते कोणीतरी भेटीन ..
माया आयटम वाला
गुत्ता कधी तरी सुटीन
वाट पायता पायता
चार पीएमट्या पुढून जातात ..
ज्या गाडीत बसतो तथी
काकू , मावश्याच दिसतात..
कवा वाजिन सांग देवा
माया प्रेमाची ढोलगि ..
भेटीन का मले ISI मार्क वाली
मजबूत , टिकाऊ पोरगी ..
कुठ लोक झुरू झुरू
मी शिंगल असाच राइन..
मले बी पायजे आता
एक रापचिक valentine..
मले बी पायजे आता
एक रापचिक valentine.........
No comments:
Post a Comment