Tuesday, February 11, 2014

कधी असेही जगून बघा...!!

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा !!

“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा !
कधी असेही जगून बघा…..!!

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा !
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा !
कधी असेही जगून बघा…..!!

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा !
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होउन तर बघा !
कधी असेही जगून बघा…..!!!

वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा !
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा !
कधी असेही जगून बघा…!!

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ र्प्रेम करुन तर बघा !
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा !
कधी असेही जगून बघा...!!

No comments: