Saturday, August 16, 2014

फेसबुकवरचे मनोरूग्ण

फेसबुकवरचे मनोरूग्ण
फेसबुकवरील माझ्या शत्रूंचा एक मोठा मानसिक प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला आहे.
मी त्यांना किंमत देत नाही, त्यांना मान देत नाही ही गोष्ट त्यांच्या फारच
जिव्हारी लागते. पण मी त्यांना मान देत नाही यामागे त्यांची लो मेंटॅलिटी हेच कारण आहे.
ज्यांना वागायचे कसे, बोलायचे कसे हे कळत नाहीत, जे लोक अजूनही तथाकथित महापुरुषांच्या सावलीत, तेही आपापल्या जातीच्या महापुरुषांच्या सावलीत खुरटलेले जीवन जगतात, द्वेष पूर्ण, शिवीगाळ युक्त भाषा वापरतात, ब्राम्हण द्वेष हाच ज्यांच्या विचाराचा पाया आहे, त्यांच्याविषयी मला प्रेम वाटण्याचे कांही कारण नाही. त्यांचे आदर्श माझे आदर्श होवू शकत नाहीत.
एक साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ति आपल्यास किंमत देत नसेल तर आपण त्या व्यक्तीला परत-परत फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवायचे कारण नाही, तसेच त्या व्यक्तीला खाजगी मेसेज पाठवायचे कारण नाही. पण जर हे लोक असे करत असतील तर त्याचे कारण मी त्यांना मित्र मानावे अशीच त्यांची इच्छा आहे हे दिसून येते. पण सॉरी, अशा लोकांना मी माझे मित्र बनवू शकत नाही. जर तुम्हाला एखाद्याची मैत्री पाहिजे असेल, तर आधी तुम्ही नीट वागायला, नीट बोलायला शिकले पाहिजे.
कांही बालीश पोरे मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करतात, त्यांचे मला हसू येते. आज विद्रोही, बंडखोर असणारी ही पोरे आणखी कांही वर्षांनी वास्तवतेची जाणीव झाल्यावर जमिनीवर येतात. अशी शेकडो मुले मी बघितली आहेत, की जी द्वेषपूर्ण विचारांच्या आहारी गेल्याने पुढे बरबाद झाली आहेत. त्यांना कांही चांगले सांगायला गेले की पटत नाही. त्यामुळे घेऊ द्या त्यांना अनुभव, आणि तो घेण्यासाठी आपल्या आयुष्यातली मोलाची वर्षे घालवू देत वाया अनुभव येईपर्यंत.
आपले काय जाते?
लेखक-महावीर

No comments: