Monday, March 10, 2014

गारा...

गारा...

कष्ट सारे मातीत गेले
स्वप्न ऊद्याचे पाण्यात वाहिले
निसर्गाचे असे चक्र फिरले
आभाळ आमच्यावर असे का रुसले ?

खुप कष्टाने ज्यास ऊभे केले
पोरां परीस त्यास जपले
स्वप्न ऊद्याचे पाहता-पाहता
गारांनी सारेच मातीत मिळविले...े

आता सारेच आरडा ओरडा करतील
शेतकऱ्यांचा खुप पुळका दाखवतील
गारांनी झोडपलेल्या पाल्यावरतीच
स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजतील...

दुःख शेतकऱ्यांचे कुणा न कळले
काळ्या आईचे ऊपकार सारे विसरले
निवडनुकांच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे
दुःख ही आज दुय्यम ठरले...
-एक दुःखी शेतकरी.

No comments: