Friday, April 5, 2013

एक दगडाच मन दे . .

आजवर काही मागीतल नाही
पण आज एक वर दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .।।
हजार वार होतात
आज या काळजावर
जवचेच सोडून जातात
अनोळखी वळनावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।
आठवनी जवळ राहतात
त्यांच्या आनखी काही नाही
सावली सारख्या पाटलाग
करतात आनखी काही नाही
दिलास आता दुरावा तसेच
सहनशीलतेच बळ दे हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।
एकांताला आपल मानतो
आता मला कोणीच नको
मीच स्वत:ची समजूत घालतो
आता दुस~याला ञास नको
पण ज्यांनी दिल दु:ख मला
त्यांना भर-भरुन सुख दे हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।
ते दुर आहेत खुप माझ्या
तरी का ही ओढ आहे ?
सुखात असतील माझ्यावीना
हीच जानिव गोड आहे
त्यांच्या जीवनात आनंद
आणि हवतर मला दु:ख दे हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।
- प्रितम साळवी

No comments: