Tuesday, April 2, 2013

आज मला लहान व्हायचय...

आज मला लहान व्हायचय,
लाडात बोलुनी, गाडी गाडी खेळूनी,..
माझ्या आईच्या मांडीवर डोक ठेवायचंय,
माझ्या बाबांचे बोट धरून पुन्हा एकदा चालायचेय,

दप्तर घेउनि (२) शाळेत जायचय,
शाळेतल्या मुलींच्या वेण्या खेचयचय,
खुर्ची तुटली अन पडलेले गुरुजी मला बघायचय,
माझ्या गुर्जींच्या चडिच मार मला खायचय.

आज मला लहान व्हायचय,
मामा मामीनी दिलीले चोक्लेत खायाचेय,
मी नाही देणार चोक्लेत (२) म्हणुनी,..
माझ्या बहिणी ला ठेंग मला दाखवायचाय.

आज मला लहान व्हायचय...
एकदा तरी मला ती मज्जा अनुभावायचीय..
आज मला लहान व्हायचय...
आज मला लहान व्हायचय...
- प्रितम साळवी

No comments: