का कळतच नाहि अस का होत……
का कळतच नाहि अस का होत……
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
तिचा तो मोहक चेहरा,
बिंधास्त बोलण,
हसताना खाली पहाण,
नसताणाही जवळ असण,
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
तिची ती पहिली भेट,
जगाला भीत भीत दिलेला होकार,
गोंधळलेली ती,
आणि माझ्या आनंदाचा पारावार,
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
आनंदाचे दिवस दणभर,
पालटूण येणारा दुरावा,
दूर झालेली ती,
अन गोंधलेला जीव माझा,
का कळतच नाहि अस का होत, मन आठवणीत
तिच्या गुंतूणच रहात……
जर वरचाच बांधतो शतजन्माच्या गाठी,
मग का घड्तात या भेटी,
गोठून रहातात फ़क्त आठवणी,
का कळतच नाहि अस का होत,
मन आठवणीत तिच्या गुंतूणच रहात……
No comments:
Post a Comment