मिठीत स्वप्न जागतो मी
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोर तो मी
अधरे जुळली या मिठीत मावली
स्वप्नातली तू परी...
गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधता हे
गुलाबी गंध ओळखीचे
फुलला हलवा हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...
तुझेच स्वप्न पाहतांना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना
बघ ना वळूनी चांदणीही लाजली
स्वप्नातली तू परी..
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोर तो मी
अधरे जुळली या मिठीत मावली
स्वप्नातली तू परी...
गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधता हे
गुलाबी गंध ओळखीचे
फुलला हलवा हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...
तुझेच स्वप्न पाहतांना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना
बघ ना वळूनी चांदणीही लाजली
स्वप्नातली तू परी..
No comments:
Post a Comment