Friday, December 14, 2012

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे आंब्याच लोणचं
ओठावर घेताच .
झाकलेल्या.डोळ्यातूनच सर्व भावना कळतात..
प्रेम म्हणजे मिरची चा ठेसा..
जिभेला चिटकताच

भिजलेल्या डोळ्यातूनच सर्व भावना कळतात..
प्रेम म्हणजे गुलाबजामून..चा पाक..
तोंडात घेताच..
फुललेल्या गालातूनच सर्व भावना कळतात..
प्रेम म्हणजे थंडगार बर्फ..
जीभेमध्ये पकडताच..
मिटलेल्या डोळ्यांनीच साऱ्या भावना कळतात..
प्रेम म्हणजे..गरम चहा..
सुर्र्र कून येनारया आवाजातूनच
साऱ्या भावना कळतात..
अश्या प्रेमाच्या खूप व्याख्या आहेत..
ज्या कि फक्त भावना व्यक्त करतात..
पण ज्याला त्या भवना फक्त ईशारयातूनच
कळतात..
त्याला खर प्रेम म्हणतात....

Monday, December 10, 2012

स्वप्नातली तू परी

स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरी
तुझ्यात सप्तसूर माझे
झुरे निशा बावरी
सये निशा अशी दिवाणी

मिठीत स्वप्न जागतो मी
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोर तो मी
अधरे जुळली या मिठीत मावली
स्वप्नातली तू परी...
गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधता हे
गुलाबी गंध ओळखीचे
फुलला हलवा हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...
तुझेच स्वप्न पाहतांना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना
बघ ना वळूनी चांदणीही लाजली
स्वप्नातली तू परी..

Sunday, December 9, 2012

•♥ ती असावी अशी •♥

•♥ सगळेच म्हणतात.....
ती असावी अशी •♥
.
.
•♥ फुललेल्या गुलाबाची कळी
. . . . . . . , , . . जशी..•♥
.
.
.
•♥ ती बोलावी अशी
सुरात कोकिळा गावी जशी..•♥
.
.
.
•♥ ती हसावी अशी ?
लहानशी भाउली हसावी जशी..•♥
.
.
.
•♥ अन ती दिसावी अशी ?
अप्सरा पृथ्वीवर यावी जशी...•♥
पण...
.
.
•♥ माझी ती परी मला हवी कशी?
.
.
.
.
•♥ ती मला हवी अशी...
चंद्रा कडे ही नसावी चांदणी जशी.•♥
.
.
•♥ काय वाटते मित्रानो तुम्हाला?
मला मिळेल का अशी....•♥