सगळ्यात जवळचं माणूस नजरेसमोर नसतं तेव्हा येते ती आठवण...
पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर अलगद झेलताना येते ती आठवण...
गोड गुलाबी थंडीत मायेची ऊब मिळते ती असते आठवण...
झोंबणारा वारा हळूच हितगुज करून जातो ती असते आठवण...
तिन्ही सांजेला आभाळ दाटून येतं ती असते आठवण...
अवखळ समुद्राला शांत, शीतल सरिता मिळते ती असते आठवण...
पानगळतीच्या वेळी स्तब्ध उभा राहिलेला वृक्ष असतो एक आठवण...
तोच वृक्ष सोसाट्याचा वारा झेलतो आणि अनेक पावसाळ्यांचा साक्षीदार असतो ही असते आठवण...
निसर्गाच्या प्रत्येक हालचालीत जाणवते ती आठवण...
आई हा शब्द पहिल्यांदा उच्चारणं असते एक आठवण...
आईचं बोट धरून रांगणारा पोर चालू लागतो ती असते आठवण...
भुकेलेल्या पिलाला घास भरवते आई... ती एक आठवण...
आईच्या डोळ्यांदेखत मुलं आकाशात उंच झेप घेतात ती असते आठवण...
पहिल्या पगाराची आईसाठी नवी कोरी साडी... ती एक आठवण...
सरतेशेवटी "आई तुला नाही गं कळत यातलं काही' असं म्हणण्याजोगी मोठी होतात मुलं...
ती एक आठवण...
No comments:
Post a Comment