Saturday, April 11, 2015

Destiny

नेहमीच नसतं अचूक कुणी, 

घड्याळ देखील चुकतं राव.

जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता 

निसटून जातो हातून डाव.

पडत जातात उलटे फासे 

घरासोबत फिरतात वासे,

अश्या वेळी मोडू नये 

धीर कधी सोडू नये.

नशिबाच्या नावानेही 

उगीच बोटं मोडू नये.

भरवश्याचे करतात दावे, 

आठवू नये त्यांची नावे.

सगळी दारं मिटतात तेव्हा 

आपणच आपला मित्र व्हावे...

मग अचूक दिसते वाट, 

बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत 

झेलता येते प्रत्येक लाट,

ज्याला हे जमलं त्याला 

सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी 

वाट सोडून वाहतील वारे,

म्हणून म्हणतो इतकं तरी 

फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार, 

स्वतःत शोधून पहा.…!

– गुरु ठाकूर

Tuesday, March 24, 2015

शब्द्

शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
    शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
    शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
    शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
    आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
 
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल
आणि जो मन: जिंकेल तो जग जिंकेल".

Saturday, March 21, 2015

आमची श्रीमंती

कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून...
आजवर खूप माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!

नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...

ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या
प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे
भरपूर आहेत.
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती, यावरून
माणसाची श्रीमंती कळते.

तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.
"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".

"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".

आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते...

आवडले तर नक्की पुढे पाठवा....

Wednesday, January 14, 2015

भोगी

रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunday, January 11, 2015

साम्य - भवितव्य

कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ?
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले. मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.

मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.


दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?” मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या .

मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही. मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली. 

मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला  “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते.  हे त्या दोघांमधील साम्य.

माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही.