थेंबभर प्रेमसुद्धा , आयुष्यभर पूरत,
जेव्हा खरच तेवढ , कुणीतरी आपलास असत
थेंबभर प्रेमसुद्धा,वेड लावुन जात ,
वाट बघत रहायची सवय लावुन जात.
...
थेंबभर प्रेमसुद्धा,नात जोडून जात,
ओळखीच कुणीतरी, आपलस करून जात.
थेंबभर प्रेमसुद्धा , करून जातो अधुरी किमया,
आठवणींचा गंध देतो,स्पर्शाची लोकारमया
थेंबभर प्रेमात सुद्धा, मन पाऊस होऊन न्हात
शब्द भिजून जातात , अर्थ थेंबांना येतो
थेंबभर प्रेमसुद्धा,नवा बंध अंकुरत,
कुठेतरी मनातसुद्धा,खोलव र कुणीतरी कोरल जात
थेंबभर प्रेमसुद्धा,आठवणींचा गंध घेऊन येत.
कोमेजलेल मनसुद्धा , पुन्हा हिरवं करून जात.