शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल
आणि जो मन: जिंकेल तो जग जिंकेल".
Tuesday, March 24, 2015
शब्द्
Saturday, March 21, 2015
आमची श्रीमंती
कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून...
आजवर खूप माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!
नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या
प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे
भरपूर आहेत.
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती, यावरून
माणसाची श्रीमंती कळते.
तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.
"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".
"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".
आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते...
आवडले तर नक्की पुढे पाठवा....
Wednesday, January 14, 2015
भोगी
रसाळ उसाचे पेर
कोवळा हुरडा अन् बोरं
वांगे गोंडस गोमटे
टपोरे मटार पावटे
हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर
वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड
भोगीच्या हार्दिक शुभेच्छा !
Sunday, January 11, 2015
साम्य - भवितव्य
कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ?
जरा ओळखुन दाखव!”
मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले. मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.
मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.
दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?” मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या .
मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही. मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.
मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य.
माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -
तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही.
Tuesday, October 28, 2014
मला आवडलेली काही वाक्ये
आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला
अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. ,
कारण त्यांच्यामुळेच मला
कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .
〰〰〰〰〰
. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. ,
यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
〰〰〰〰〰
. .. आशा सोडायची नसते.,
निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे
संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
〰〰〰〰〰
. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले
की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
〰〰〰〰〰
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. .
त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला
यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
〰〰〰〰〰
. ..
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
〰〰〰〰〰
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
〰〰〰〰〰
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते.. , पण
आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना
दिर्घायुष्य लाभू दे., आणि
आयुष्यभर माझे यश पाहून
दुसऱ्यांना स्फूर्ती मिळून दे.. . ..
〰〰〰〰〰
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. .
〰〰〰〰〰
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून
दूर राहिलेले चांगले.. , कारण.,
"समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा.,
आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
〰〰〰〰〰
सुविचार पण असावे लागतात.. ,
आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
〰〰〰〰〰
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. ,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..
〰〰〰〰〰
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. ,
चांगले काम करायचे मनात आले
की ते लगेच करून टाका.. . ..
〰〰〰〰〰
. .. केवड्याला फळ येत नाही
पण त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. .
〰〰〰〰〰
. .. तुम्ही कायम सदैव खुश
राहा आणि आनंदात जगा.. . ..
〰〰〰〰〰
. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेलतर तो आकाशाला विचारा.. . ..
〰〰〰〰〰
. .. बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
〰〰〰〰〰
. .. गुलाबाला काटे असतात.. ,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.. . ..
〰〰〰〰〰
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
〰〰〰〰〰
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. मृत्यूला सांगाव., ये
कुठल्याही रुपाने ये.. , पण
जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत
माझ्याकडे आह., तोपर्यंत
तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
〰〰〰〰〰
. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार
असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
〰〰〰〰〰
. .. जखम करणारा विसरतो., पण जखम
ज्याला झाली तो विसरत नाही.. . ..
〰〰〰〰〰
. .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,
पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..???
Monday, October 27, 2014
जीवन तयाचं नाव
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही. .......
दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........
सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात
शोधल्याशिवाय कळत नाही......
समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......
मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......
आपली माणस कोण ते
संकटांशिवाय कळत नाही ........
सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......
उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......
जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....
काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......
मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......
चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.
Saturday, October 4, 2014
ऐ जिन्दगी
“थक गया हूँ तेरी नौकरी से ऐ जिन्दगी
मुनासिब होगा मेरा हिसाब कर दे...!!”
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
भरी जेब ने ' दुनिया ' की पहेचान करवाई और खाली जेब ने ' इन्सानो ' की.
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
जब लगे पैसा कमाने, तो समझ आया,
शौक तो मां-बाप के पैसों से पुरे होते थे,
अपने पैसों से तो सिर्फ जरूरतें पुरी होती है।
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
कुछ सही तो कुछ खराब कहते हैं,
लोग हमें बिगड़ा हुआ नवाब कहते हैं,
हम तो बदनाम हुए कुछ इस कदर,
की पानी भी पियें तो लोग शराब कहते हैं...!!!
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
माचिस की ज़रूरत यहाँ नहीं पड़ती,
यहाँ आदमी आदमी से जलता है..
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
दुनिया के बड़े से बड़े साइंटिस्ट ये ढूँढ रहे है की मंगल ग्रह पर जीवन है या नहीं
पर आदमी ये नहीं ढूँढ रहा कि जीवन में मंगल है या नही..
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
ज़िन्दगी में ना ज़ाने कौनसी बात "आख़री" होगी,
ना ज़ाने कौनसी रात "आख़री" होगी..
मिलते, जुलते, बातें करते रहो यार एक दूसरे से,
ना जाने कौनसी "मुलाक़ात" आख़री होगी..
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
अगर जींदगी मे कुछ पाना हो तो
तरीके बदलो, ईरादे नही..
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
ग़ालिब ने खूब कहा है..:
ऐ चाँद तू किस मजहब का है
ईद भी तेरी और करवाचौथ भी तेरा..
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
भगवान से वरदान माँगा
कि दुश्मनों से
पीछा छुड़वा दो,
अचानक दोस्त
कम हो गए...
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
" जितनी भीड़ ,
बढ़ रही
ज़माने में..।
लोग उतनें ही,
अकेले होते
जा रहे हे...।।।
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
इस दुनिया के
लोग भी कितने
अजीब है ना ;
सारे खिलौने
छोड़ कर
जज़बातों से
खेलते हैं...
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
किनारे पर तैरने वाली
लाश को देखकर
ये समझ आया...
बोझ शरीर का नही
साँसों का था....
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
दोस्तो के साथ
जीने का इक मौका
दे दे ऐ खुदा...
तेरे साथ तो
हम मरने के बाद
भी रह लेंगे....
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
“तारीख हज़ार
साल में बस इतनी
सी बदली है…
तब दौर
पत्थर का था
अब लोग
पत्थर के हैं..."
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
हम वक्त और
हालात के
साथ 'शौक'
बदलते हैं,,
दोस्त नही ... !!
º•○●º•○●º•○●º•○●º•○●
जिंदगी और भी मज़ेदार होती,
अगर दुःख ''Made in China'' होते..
Monday, September 8, 2014
गणपती निघाले दु:खात । भक्तगण नाचत-गात सुखात ।।
विचार करा । पटले तर घ्या ।।
नाहीतर एका डोळ्याने वाचा । अऩ दुसर्याने सोडून द्या ।
आज गणपती बाप्पाचे विसर्जन पाहण्यास गेलो होतो वाटले काही सुंदर छायाचित्रे काढेन...
सोबत छायाचित्रक मीत्रांचा लवाजमा होताच...
पण एक गोष्ट विलक्षण वाटली व खटकली सुद्धा ...
गणपती निघाले दुःखात । सारे भक्तगण नाचत गात ।।
त्यातपण गणपती मागे साठ जण । आणी नाचायला आठ जण ।।
त्यातले चार आठ जण तर फुलं तराठ । तरीपण आवाज मात्र जसे पाताळ-अंतराळ गाठ ।।
गणपती झाले लालेलाल । भक्तगण झाले झुलेलाल ।।
मला एक प्रश्न पडला माणूस म्रुत्यू पावतो तेव्हा असे नाचत गात का नाहीत.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
गणेश आगमनाची मिरवणूक थाटात नक्कीच करा पण विसर्जन फक्त टाळ व गणेश नामजपात करा.
हे माझी सर्व भक्त गणांन्ना नम्र विनंती आहे.
हे माझे वैयक्तिक मत आहे, मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत.
-- प्रितम साळवी
Friday, September 5, 2014
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?
इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली
शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास
आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली
पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन
शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले
गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो
आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?
ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Thursday, September 4, 2014
गणपती वर पोवाडा
क्रांतीबा फुले यांचा गणपती वर पोवाडा वाचा आणि आपल्या बहुजन बांधवांच्या कल्याणार्थ शेयर करा......
"पशुपरी सोंड पोर मानवाचे !! सोंग गनोबाचे नोंद ग्रंथी !!
बैसे उंदरावरी ठेवूनिया बुड !! फुकितो शेंबूड सोंडेतून !!
अन्तेजासी दूर, भटा लाडू देतो !! नाकाने सोलीतो कांदे गणू !!
चिखला तुडवूनी बनविला मोरया !! केला ढबू -ढेर्या भाद्रपदी !!
गनोबाची पूजा भाविका दावितो !! हरामाच्या खाती तूप- पोळ्या !!
जय मंगलमुर्ती जय मंगलमुर्ती !! गाती नित्य कीर्ती टाळ्यासह !!
उत्सवाच्या नावे द्रवे भोन्दाडती !! वाटी खिरापती धूर्त भट !!
जाती मारवाडी गरीब नाडीती !! देवूळ बांधती कीर्तीसाठी !!
देवाजीच्या नावे जगाला पीडिती !! अधोगती जाती निश्चयाने !!
खरे देव भक़्त देह कष्टविती !! पोषण करिती घरच्यांचे !!
अजाणसी ज्ञान पांगळ्या अन्नदान !! हेच बा स्मरण निर्मिकाचे !!
भोळा वारकरी त्यास दिली हूल !! स्मरणांत फळ आहे म्हणे !!
क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास !! गांठी शिवाजीस !!
मतलबी दादू कोंडदेव त्या ठेवी अविद्वान !! करवी तुलादान एदि भटा !!
स्वजातीसाठी बोधिले पाखंड !! धर्मखंड खरे जोती म्हणे !!...
आभार : फुले समग्र वाड्मय पृ. क्र. ४७१. -महाराष्ट्र शासन प्रत.
Thursday, August 28, 2014
लक्षात ठेव पोरी.........
जळगांवातील " आशा फौंडेशन " मार्फत 12,000 विद्यार्थीनींपर्यत पोहोचलेली कविता. यातून त्यांच्या सजकता व संस्कारांविषयी केलेला हा मुक्त संवाद
लक्षात ठेव पोरी.........
"""""""""""""""""""""""
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा. ॥धृ॥
तुला घराबाहेर पाठवायला, मन आमचं धजत नाही.
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं, असही वाटत नाही.
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे, जपलय तुला काळजीने.
जाणिव ठेव त्याची आणि, झेंडा लाव तुझ्या यशाचा.॥1॥
उच्छल, धांदरट राहू नकोस, स्वप्नात उगीच गुंतू नकोस.
आरशापुढे उभं राहून, वेळ वाया घालू नकोस.
मोहात कसल्या पडू नकोस, अभ्यास करण्या विसरुं नकोस.
पैसे देवूनही मिळणार नाही, तुझा वेळ आहे लाख मोलाचा.॥2॥
मन जीवन तुझं कोरं पान, त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस.
स्पर्श मायेचा की वासनेचा, भेद करण्यात तू चूकू नकोस.
मोबाईल-संगणक आवश्यकच गं, जाळ्यात त्यांच्या गुरफटू नकोस.
परक्यांवर विश्वास करू नकोस, अनादर नको करू गुरूजनांचा.॥3॥
देहाचं प्रदर्शन करण्यासाठी, संस्कार कपडे टाकू नको.
लाज वाटेल असं काही करण्यासाठी, चेहरा उगीच झाकू नको.
चूकांना येथे नसतेच कधी माफी,
गेलेली अब्रूही परत येत नाही.
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे, सतत डोळा असतो समाजाचा.॥4॥
असं विपरीत घडत असलं तरी, आमचा तुझ्यावर विश्वास आहे.
जीजाऊ, सावित्री आणि अहिल्या, किरण बेदीही तुझा आदर्श आहे.
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं, हिमतीनं तू संघर्षही करशील.
मात्र, यशावरती स्वार होण्या, लगाम लागतो बेटा संयमाचा.॥5॥
लक्षात ठेव पोरी, तू तुकडा आहेस काळजाचा.
विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा.
........प्रा.बी.एन.चौधरी.
Wednesday, August 27, 2014
रक्ताच्या नात्यांनाही आता लागते Facebook..........
रक्ताच्या नात्यांनाही आता लागते Facebook..........
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी, श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.
Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना 'virus' लागलाय
दु:खं send करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं
range नसलेया mobile सारखे
hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही website
एकविसाव्या शतकातली
पीढी भलतीच 'cute'
contact list वाढत गेली
संवाद झाले mute
computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय
floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही
विज्ञानाच्या गुलामगिरीत
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते facebook.........
पेण चा इतिहास
पेण
पेण हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे.
पेण हे गणपतीच्या मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे .
ते रायगड जिल्ह्याचे सांस्कृतिक केंद्र आहे.
इतिहास-
पेण करणे म्हणजे मुक्काम करणे. पेणे म्हणजे मुक्कामाची जागा.
सैन्याचे, व्यापारी लमाणांच्या तांडय़ाचे, घाटावरून
उतरणार्या प्रवाशांच्या मुक्कामाचे ठिकाण म्हणून या गावाला नाव मिळाले पेण.
बुद्धकाळापासून या पेणला जुन्नर - पुणे - नगर पासून माल येत असे.
बंदर म्हणूनही पेण मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. अंतोरे हे पेणचे तरते बंदर होते.
९ व्या ते १५ व्या शतकात पेण हे शिलाहार राजे, स्थानक राजे, यादव राजे, यांच्या अमलाखाली होते.
हे गाव मोठी व्यापारी पेठ व समृध शहर म्हणून
कोकणात प्रसिद्ध होते.
शिलाहार राजांच्या काळा देवीची शक्तिपूजा ही मोठी मानली जात असे.
पेणची कासार आळीतील महालक्ष्मी, वाशीची अंबा, रामेश्वर मंदिरातील गावदेवी, धावटा, चौल, नागावची आक्कादेवी येथील देवीची देवस्थाने त्या काळचीच आहेत.
शिवाची प्राचीन मंदिरे चालुक्यांनी व कदंबांनी बांधली. पेण शहरातील वाकेश्वर ( म्हणजेच आत्ताच वाकरूळ गाव )दांडेश्वर (रामेश्वर) व व्याघ्रेश्वर, गोटेश्वर,
पाचणोलीचे पाटणेश्वर ही मंदिरे त्या काळातली आहेत. अनेक शिवमंदिरे मलिक कपूर व निजामशाही सैन्याने
वेळोवेळी राजापुरीवर केलेल्या स्वारीचे वेळी पाडून मोडून टाकलेली आहेत.
पेण शहरातले गोटेश्वराचे मंदिर तर फारच भव्य होते.
या मंदिरापुढे असलेल्या नंदीच्या आकारावरुन मंदिरातील शिवपिंड किती मोठी असावी याची कल्पना येते.
त्या काळात हे शिवमंदिर या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.
या मंदिरापुढे भव्य अशी पुष्करणी होती. या मंदिराचे आवारच ५ ते ६ एकराचे होते.
या आवारात भव्य असा बगीचा होता.
शाइस्तेखान पुण्याला आला असताना नामदार ताहेरखान नावाचा सरदार मिऱया डोंगरावर
आपली छावणी टाकून मुक्कामाला होता.
ताहेरखानाने पेणवर छापा घातला त्यात हे शिवमंदिर उध्वस्त केले.
शिवाजी महाराजांनी पेणवर छापा घालण्यापूर्वी २७ फेब्रुवारी १६६२ चे सुमारास मिऱयाडोगरावर
छावणी टाकलेल्या खानास व रतनगडावरील
बलाकी सरदारास वेढा घातला.
नेताजी पालकराने उंबरखिंडीच्या युद्धात खानाच्या सैन्याकडून जांभुळपाडय़ाचा परिसर मुक्त केला.
तर शिवाजीच्या कावजी कोंडाळकराने रतनगड
जिंकून बलाकी सरदारास पळविले.
बारा हजार सैन्य व सातशे पायदळासह नेताजी पालकराने मिऱया डोंगराला वेढा दिला.
वाघोजी तुपे, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, सचिव शंकर नारायण यांची कुमक येताच नामदार
खानाचा पराभव होऊन खान पळून गेला.
दुसऱया दिवशी २८फेब्रुवारी १६६२ रोजी सकाळीच शिवाजीचे हे सैन्य वाघोजी तुपे या सरदाराच्या नेतृत्वाखाली पेणच्या गढीवर चालून गेले.
पेणच्या गढीला वेढा पडला. (पेणच्या मामलेदार
कचेरीची जागा ही पेणची जुनी गढी होती.)
गढीचा संरक्षक खानही त्वरित तयारीनिशी वाघोजी तुप्याच्या समोर तलवारीनिशी उभा राहिला.
समबल असलेले दोन्ही वीर लढत होते. दोन्ही वीर
जखमांनी बेजार झाले.
शेवटी एका योग्य क्षणी वाघोजी तुपे यांनी खानावर जबरदस्त प्रहार करून त्यास यमसदनास पाठविले.
या लढाईत वाघोजी तुपेस २७ जखमा झाल्या.
या युद्धात मरण पावलेल्या मराठा सरदारांच्या समाध्या आजही मामलेदार कचेरीच्या प्रांगणात दिसतात.
यानंतर, पेण मराठी साम्राज्याच्या अंतापर्यंत स्वराज्यात राहिले.
पेशवेकाळात पराक्रमी सदाशिवराव भाऊंच्या पत्नी, पार्वतीबाई ह्या पेणमधील कोल्हटकर घराण्यातील होत्या.
स्वातंत्र्यसंग्रामातही पेणकर आघाडीवर होते. यात हुतात्मा विनायकराव कोल्हटकरांसारख्या अनेक सशस्त्र क्रांतिकारकांचाही समावेश होता.
भौगोलिक १८° ४०' उ. अक्षांश व ७३° ०५' पू. रेखांशावर वसलेले पेण शहर रायगड जिल्ह्यात येते.
पेणच्या पूर्वेकडील भाग डोंगराळ असून खाडीलगतचा पश्चिम विभाग वैशिष्ट्यपूर्ण 'खारेपाट' विभाग म्हणूनओळखला जातो.
पेण शहराचे क्षेत्र ६.६७ चौरस मैल व तालुक्याचे क्षेत्र १९९.६ चौरस मैल इतके आहे.
[४] जिते :- पनवेल मंगलूर राष्ट्रिय महामार्गवर पेण पासून उत्तरेला 10 किमीवर मुंबई पासून 70 किमी तर पनवेल पासून 21 किमीवर. गावालगद उत्तरेला जिते रेल्वे स्टेशन.
श्री लक्ष्मी नारायण देवस्थानची 50 वर्षे, 10 मे ते 14 मे 2013 प्रतिष्ठान महोत्सोव चे आयोजन.
अधिक वाचन 'पेण तालुक्यातील स्वातंत्र संग्रामाचा इतिहास';
लेखक: प. रा. दाते 'कर्मयोगी रामभाऊ मंडलिक';
लेखक: मा.के. सहस्रबुद्धे 'पेण शहराचा इतिहास'
Saturday, August 16, 2014
फेसबुकवरील विरोधकांना नामोहरम आणि फ्रस्ट्रेट करण्याचे सोपे मार्ग
MIND GAME: फेसबुकवरील विरोधकांना नामोहरम आणि फ्रस्ट्रेट करण्याचे सोपे मार्ग
Please share this.
1. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपण त्यांना किंमत दिली नाही की ते फ्रस्ट्रेट होतात.
2. तुमच्या पोस्ट्स वर त्यांनी केलेल्या कॉमेंट्स डिलीट करा. त्यामुळे ते सैरभैर होतात.
3. ते तुमच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये असतील तर त्यांना लिस्टमधून काढू टाका.
अशा लोकांच्या पुन्हा रिक्वेस्ट आल्या तर त्या मंजूर करू नका. असे केले तर ते निराश होतात,
चिडतात, चरफडतात .
4. त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या आदर्श महापुरुषावर टीका करा. असे केले की ते
त्यांना फारच झोंबते.
5. त्यांच्या विरोधकांच्या पोस्ट्स लाईक करा, त्यावर अनुकूल कॉमेंट्स द्या. यामुळेही ते
वैतागतात.
6. त्यांचे वर्मस्थान ओळखा आणि वेळ प्रसंगी वर्मावर घाव घाला.
7. ब्लॉक करा. हे त्यांच्यासाठी फारच धक्कादायक असते. म्हणजे अगदी बडतर्फ केल्यासारखे.
अशी ब्लॉक केली मंडळी एकत्र येऊन तुमच्या विरोधात लिहित रहातील. पण त्याचे अजिबात
टेन्शन घेऊ नका. दृष्टी आड सृष्टी. तेथे काय चालले आहे याचा अजिबात विचार करू नका.
8. तुम्हाला मेसेज पाठवून कोणी त्रास देत असेल तर त्याला 'भौन्कते रहो' एवढेच उत्तर द्या.
त्यामुळे तो आणखी जोरजोरात भुंकत राहील. त्याची शक्ती तुम्हाला शिव्या देण्यात
वाया जाउदे.
जेंव्हा अनेक लोक एकत्र येऊन तुमच्यावर टीका करायला लागतात, तेंव्हा ते लोक
तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. ते तुमचे अनपेड जाहिरात एजंट असतात.
शहाण्यांना अशा लोकांची लायकी माहीत असते. त्यामुळे तुमच्यावरील टीका ते लोक
मनावर घेत नाहीत. तुमची 'कुप्रसिद्धी' फक्त फालतू लोकांमध्येच होते.
तसेच तुमच्यावर जेंव्हा टीका होते, तेंव्हा तुमचे खरे मित्र कोण आहेत आणि मित्रांच्या रुपात शत्रू
कोण आहेत हेही कळते.
+++
लेखक-महावीर
फेसबुकवरचे मनोरूग्ण
फेसबुकवरचे मनोरूग्ण
फेसबुकवरील माझ्या शत्रूंचा एक मोठा मानसिक प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला आहे.
मी त्यांना किंमत देत नाही, त्यांना मान देत नाही ही गोष्ट त्यांच्या फारच
जिव्हारी लागते. पण मी त्यांना मान देत नाही यामागे त्यांची लो मेंटॅलिटी हेच कारण आहे.
ज्यांना वागायचे कसे, बोलायचे कसे हे कळत नाहीत, जे लोक अजूनही तथाकथित महापुरुषांच्या सावलीत, तेही आपापल्या जातीच्या महापुरुषांच्या सावलीत खुरटलेले जीवन जगतात, द्वेष पूर्ण, शिवीगाळ युक्त भाषा वापरतात, ब्राम्हण द्वेष हाच ज्यांच्या विचाराचा पाया आहे, त्यांच्याविषयी मला प्रेम वाटण्याचे कांही कारण नाही. त्यांचे आदर्श माझे आदर्श होवू शकत नाहीत.
एक साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ति आपल्यास किंमत देत नसेल तर आपण त्या व्यक्तीला परत-परत फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवायचे कारण नाही, तसेच त्या व्यक्तीला खाजगी मेसेज पाठवायचे कारण नाही. पण जर हे लोक असे करत असतील तर त्याचे कारण मी त्यांना मित्र मानावे अशीच त्यांची इच्छा आहे हे दिसून येते. पण सॉरी, अशा लोकांना मी माझे मित्र बनवू शकत नाही. जर तुम्हाला एखाद्याची मैत्री पाहिजे असेल, तर आधी तुम्ही नीट वागायला, नीट बोलायला शिकले पाहिजे.
कांही बालीश पोरे मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करतात, त्यांचे मला हसू येते. आज विद्रोही, बंडखोर असणारी ही पोरे आणखी कांही वर्षांनी वास्तवतेची जाणीव झाल्यावर जमिनीवर येतात. अशी शेकडो मुले मी बघितली आहेत, की जी द्वेषपूर्ण विचारांच्या आहारी गेल्याने पुढे बरबाद झाली आहेत. त्यांना कांही चांगले सांगायला गेले की पटत नाही. त्यामुळे घेऊ द्या त्यांना अनुभव, आणि तो घेण्यासाठी आपल्या आयुष्यातली मोलाची वर्षे घालवू देत वाया अनुभव येईपर्यंत.
आपले काय जाते?
लेखक-महावीर


