Thursday, July 31, 2014

निसर्गाचा पंचनामा

भिमाशंकरच्या डोंगरात
शापीत रात्र आली
तुफानी पावसात
दरड कोसळली
जेथे होते एक गाव
ते गाडले गेले
कोरलेले माळीन नाव
क्षणात उध्वस्त झाले
चिली पिली पाखरे
मुकी आज झाली
हंबरणारी गाय वासरे
गोठयातच मेली
कुठे कुठे शोधू ती प्रेते
रक्ताचा चिखल झाला
भेट देतील सर्व नेते
म्हणे आता पंचनामा केला
असे कसे आज झाले
निसर्गाच्य कोपामुळे
कुणीच नाही उरले
हुंदकयात शब्द अडले
इथेच होते माळीन गाव
हसरे फुलते माणसाचे नाव
पुणे जिल्हा आंबेगाव तालुका माळीन गाव गाडले गेले टिव्हीवर पाहून मन हेलावले
या गावातील शेकडो मृताना माझी भावपूर्ण श्रद्धांजली..

Wednesday, July 23, 2014

आईची कैफियत

गुंठा गुंठा जमीन विकून आज
गोफ आलाय गळ्यात
पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला
उद्या रक्त येईल डोळ्यात

काळ्या आईच्या तळतळीचा
हा दागिना किती दिवस जाईल ?  
हाच सोन्याचा हार
उद्या गळ्यातला फास होईल

निबंधक कार्यालयात
बहिणीचा हक्कसोड करून घेतला म्हणून
मनातल्या मनात
किती भयानक हसतो आपण ?
बापाचा अंगठा मिळावा म्हणून
आईचंही कुंकू पुसतो आपण

जन्माच्या सातबाऱ्यावर
बोजा चढला काय
आणि उतरला काय
जित्या माणसांच्या काळजात
बघा ना किती फेरफार झालाय !

सपरातून बंगल्यात आलो
म्हणजे काय शेणसड्याचं पुनर्वसन झालं ?
मळलेलं अंग झाकलं म्हणजे काय
सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं ?

ज्या दिवशी आपल्या गावाचं टाऊन झालं
त्याच दिवशी बघा ना
माणसाचं मार्केट किती डाऊन झालं !

भूक आहे तशीच आहे
पण भाकर बघा ना
कशी मॉलमधल्या काचेमध्ये करपून गेली
आभाळाएवढी तहान
एका बाटलीत झिरपून गेली

सायबर कॅफेत मांडीवर बसून
चिमण्या पिल्लांनी आईला
कसा मागायचा चुलीवरचा घास ?
अत्तराच्या बाटलीत सांगा ना
भरता येतो का मातीचा वास ?

Monday, April 14, 2014

Nadichya katavar gharkul fulvu~~~

Naidichya kathavar Chal basayla jau
Tithe aaple gharkul fulvu
Ekmekanchya hatat hat gheun basu 
Thodishi ladi godi lau
Thodishi thatta maskari karu
Nadichya katavar basayla jau~~~
Tithe aaple gharkul fulvu~~~

Ekmekanchya khandyavar dok theu
Aaple hrudayspandane julvu
Nadichya katavar basayla jau~~~
Tithe aaple gharkul fulvu~~~

Chal aapan kathavar khatti mithi pani puri khau
Mirchi laglich Tula tr dolyatun pani nko yeun deu
Nadichya katavar basayla jau~~~
Tithe aaple gharkul fulvu~~~

Sansaratli aambat god tikhat Chavi chakhu
Sansaratlya sukha-dukhat ekmekanchi sath deu
Nadichya katavar basayla jau~~~
Tithe aaple gharkul fulvu~~~

Aani aapanch aaplya chotyashya aayushyatle gharkul fulvu
Aaplya Prarthanela parth disha deu
Nadichya katavar basayla jau~~~
Tithe aaple gharkul fulvu~~~
Kavi - Pritam Salvi.

Thursday, March 27, 2014

काही मुले असतातच असे

पागल पागल पागल
खरच काही मुले असतातच असे,.
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम
करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत
असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे...
मुले असतातच असे,.
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात
पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
मुले असतातच असे,.
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
खरच काही मुले असतातच असे,.
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील
स्वताला विसरून त्यात
आपले प्रेम शोधणार....

Monday, March 17, 2014

माझी सखी

ती समोर असताना,
मी सारं काही विसरावं.
तिने इश्य करत लाजावं,
मी ‘हाय हाय’
करत घायाळ व्हावं.

तिने कित्ती सुंदर दिसावं,
जसं गुलाबाचं फूल उमलावं.
कोणाच्याही नजरेत भरावं,
तासन तास पाहत रहावं
आणि पाहतंच रहावं.....

तिने कित्ती गोड बोलावं,
ऐकणाऱ्याने विरघळून जावं.
हरवूनच जावं, सोबत तिच्या.
तिने कित्ती साधं रहावं,
त्यातही रूप तिचं खुलावं.
कोणीही फिदा व्हाव, अदांवर तिच्या.....

तिचं उदास होणं,
कसं हृदयाला भिडावं.
कोणालाही वाईट वाटावं, अश्रूंनी तिच्या.
तिचं हसणं, कोणालाही सुखवावं.
कोणीही घसरून पडावं,
गालावरल्या खळीत तिच्या.....

तिच्या नजरेने मलाच शोधावं,
अचानक नजरेने नजरेला भिडावं.
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं,
लाजेने चूर चूर व्हावं.

तिने फक्त माझंच रहावं,
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं.
साथ देऊ जन्मोजन्मी,
विरहाचं दुख कधीही न यावं......
कधीही न अनुभवावं.....

Monday, March 10, 2014

गारा...

गारा...

कष्ट सारे मातीत गेले
स्वप्न ऊद्याचे पाण्यात वाहिले
निसर्गाचे असे चक्र फिरले
आभाळ आमच्यावर असे का रुसले ?

खुप कष्टाने ज्यास ऊभे केले
पोरां परीस त्यास जपले
स्वप्न ऊद्याचे पाहता-पाहता
गारांनी सारेच मातीत मिळविले...े

आता सारेच आरडा ओरडा करतील
शेतकऱ्यांचा खुप पुळका दाखवतील
गारांनी झोडपलेल्या पाल्यावरतीच
स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजतील...

दुःख शेतकऱ्यांचे कुणा न कळले
काळ्या आईचे ऊपकार सारे विसरले
निवडनुकांच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांचे
दुःख ही आज दुय्यम ठरले...
-एक दुःखी शेतकरी.

तुला काहितरी बोलावेस वाटत मला.......

तुला काहितरी बोलावेस वाटत मला......."
तु खूप छान दिसतेसं"
असं तुला म्हणावेस वाटत मला........
अंगावर पाऊसाच्या पाण्याचा
वर्षाव झाल्यासारखं तु हसतेसं...
आईसक्रिम खायाला नाही मिळालेल्या
लहान मुलीसारखं तु रुसतेस...

तुझ्या सहवासात राहवेसं वाटत मला....."
तुझा स्वभाव छान आहे"
असं म्हणावेसं वाटत मला........
दुर्मिळ भागातुन वाहणा-या
शितल सरितेसारख तु शांत राहतेसं....
आणि,कोकिळेच्या मुखातुन निघणा-या
सुंदर आवाजासारखे तु बोलतेस....

तुझ्या दुनियेत यावेसं वाटत मला......"
माझ तुझ्यावरच प्रेम आहे"
असं म्हणावस वाटत मला.....
समुद्रामधील शिँपल्यातील
मोत्यासारखं तुला माझ्या हदयात
ठेवावेसं वाटत मला......आणि,
मोबाईलमधील बँटरीसारखं
तुला जिवनभर साथ दयावेसं वाटतमला......

Koni kuthe bandhalya reshimgathi...

Mukyane bolale geet te jahale
Swapna sakarle pahate pahile
Naav natyala kay nave
Vegale mandale sohale tujsathi
Milave tujhe tula aas hi othi
Koni kuthe bandhalya reshimgathi
Julun yeti reshimgathi
Aapulya reshimgathi
Unhache chandane umbaryat sandale
Daav soneri sukhache kuni mandale
Khel ha kaalcha aaj kon jinkale
Haravale kavadase mulun te shodhale
Ekmekanna kay have
Je have sagalech aanale tujsathi
Kalave tuze tula mi tuzyasathi
Koni kuthe bandhalya reshimgathi...
Kalave tuze tula mi tuzyasathi...
Kalave tuze tula mi tuzyasathi...
Kalave tuze tula mi tuzyasathi...

Monday, March 3, 2014

आयुष्यभर तुझ्या सोबत मीच असेन

आयुष्यभर तुझ्या सोबत मीच असेन.
तु हसताना तुला हसवणारी मीच असेन.
तु रडताना अश्रु पुसणारी पण मीच असेन.
तु वाटेवर चालताना वाट पण मीच असेन.
वाटेत चुकला तरी वाट दाखवणारी पण
मीच असेन.
तु शेतावर काम
करताना दुपारी तुझ्यासाठी कांदा भाकर
घेऊन येणारी मीच असेन.
तुला घाम आला म्हणुन पदराने घाम
पुसणारी पण मीच असेन.
नदी ओलांडताना तुझा हात धरणारी पण
मीच असेन.
गुढीपाडव्याला तुझ्या सोबत
नऊवारी नेसुन गुढी उभारणारी पण मीच
असेन.
माँल मध्ये जीन्स टाँप घालून
फिरायला जाताना मीच असेन.
तु हात धरलास म्हणुन लाजणारी पण मीच
असेन.
तुझ्या सोबत पिझ्झा खाताना मीच असेन.
तुझे फोटो चांगले आले तर ते काढणारी पण
मीच असेन.
तू मला घरी सोडताना डोळ्यात अश्रु
आणणारी पण मीच असेन.
तु रात्री झोपताना जिच्या विचारात
झोपशील ती पण मीच असेन.
तुझ्या स्वप्नात आलेली राणी पण मीच
असेन.
सकाळी हळुच तुझ्या कानात good
morning बोलुन तुला उठवणारी पण मीच
असेन.
तु कविता करताना तुझी कविता पण मीच
असेन.
संकटाच्या वेळी तुझ्या संकटा समोर
उभी असलेली मीच असेन.
मंद वाऱ्याची झुळुक जेव्हा तुला स्पर्श
करेल त्या स्पर्शात पण मीच असेन.
तुझ्या प्रत्येक आंनदात तुझ्या सोबत
मी असेन.
तर दुःखात सोबत पण मीच असेन.
आणि तुला प्रेम करणारी फक्त मीच असेन.
तुझ्या जीवनाची सोबती व शेवट पर्यत
मीच सोबत असेन.
आणि ती फक्त मीच असेन.

Thursday, February 27, 2014

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी
जय महाराष्ट्र

Monday, February 24, 2014

खऱ्या प्रेमाची आठवण

"खऱ्या प्रेमाची आठवण
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा
वाचत असत कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु
लपवुन रडत असत कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन
बघत असत कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर
का जळत असत कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी
स्वप्न बघत असत कोणीतरी..
कुणी येणार नाही
तरी वाट बघत असत कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत
का एकट असत कोणीतरी...

आय पी सी (IPC) १८६०

आय पी सी (IPC) १८६०

कलम १४- शासकीय सेवक
कलम २१ -लोकसेवक
कलम २२- जंगम मालमत्ता
कलम २३ -गैर्लभ किंवा गैर्हानी 
कलम २४ -अपप्रमनिक्पने
कलम २५ -कपतिपनने
कलम २६- समजण्यास कारण
कलम २८- बनवतीकर्ण किंवा नकलीकरन
कलम २९- दस्त्ताइवज
कलम २९ (अ) -वीदूत नोंदी
कलम ३० -मुल्य वान रोखा
कलम ३३ -कृती अकृती
कलम ३४- सामाईक इरादा
कलम ३९ -आपखुशीने कींवा इचापुर्वक
कलम ४० -अपराध
कलम ४१- वी शे श  कायदा
कलम ४२ -थानीक कायदा
कलम ४४ -श ती / हानी
कलम ५२ -सद्भावनेने / शुद्ध हेतूने
कलम ५२ (अ) -आसरा देणे

                   आपवाद
कलम ७६ -कायदेशीर बांधील असलेल्या        व्यक्तीने आथवा तथ्ये विषयक चुक्भूलीमुळे केलेली कृती अपराध होत नाही
कलम ८२ -सात वर्ष वयाखालील बालकाने केलेली कृती
कलम ८३ -सात वर्षावरील व बारा वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती आसलेल्या बालकाने केलेली कृती
कलम ९६- खासगीरीत्या बचाव करण्याच्या ओघात केलेली गोष्ट
कलम ९७ -शरीराचा व मालमत्तेचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क
कलम १०० -शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा मृतु घडून आणण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०१ -आसा हक्क मृतुहून अन्य अपाय करण्या इतपत केंवा व्यापक आसतो
कलम १०२-शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क सुरु होणे व चालू राहणे
    
             अप्प्रेर्णा वीषयी
कलम १०७- एखा द्या गोष्टीचे अप्प्रेरन
कलम १०८- अप्प्रेरक
कलम १०९- अपप्रेरणामुळे परीणामतः
कलम ११४- अपराध घडला तेंव्हा अपप्रेरक हजार आसने

     सार्वजनीक प्रशान्त्तेच्या वीरोधी अपराधा वीषयी
कलम १४१- बेकायदेशीर जमाव
कलम १४२- बेकायदेशीर जमावाचा घटक आसने
कलम १४३- शीक्षा
कलम १४४- प्राणघातक हत्त्यारासः बेकायदेशीर जमावात सामील होणे
कलम १४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाल्याचे माहीत असूनही सामील होणे
कलम १४६- दंगा करणे
कलम १४७- दंगा करण्याबद्दल शी शा
कलम १४९- वीधी नी युक्त  जबाबदारी
कलम १५१- पाच कींवा आधीक व्यक्तींना पंग्न्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक थांबून राहणे
कलम १५३(अ) -धर्म,वंश,जन्म्थन,नीवास भाषा इ. कारणावरून नीरनीराळया गटामध्ये शत्त्रुतव वाढवणे
कलम १५९- दंगल
कलम १६०- दंगल करण्याबद्दल शीक्षा

       लोक्सेवाकांकडून कींवा त्यासबंधी घडणाऱ्या अप्राधावीशइ
कलम १७०- लोक्सेव्काची बतावणी करून  तोत्यागीरी करणे
कलम १७१-लोकसेवक वापरतो तशी वर्दी कींवा ओळख चींह कपट  करण्याच्या उद्देशाने वापरणे, परीधान करणे

         लोक्सेव्कांच्या कायदेशीर   प्रधीकाराच्या अव्मानावीश इ
कलम १७२- समन्सची बजावणी  कींवा इतर कार्येवाही टाळण्यासाठी फरारी होणे
कलम १८१- लोकसेवक यांच्या समोर श्प्तेव्र खोटे कथन करणे
कलम १८८- लोक्सेव्काने जारी केलेल्या आदेशाची अव्दन्या करणे

        खोटा पुरावा आणी सार्वजनीक न्यायाच्या वीरोधी अपराध
कलम २०१- अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा करणे कींवा खोटी माहीती देणे
कलम २२३- लोक्सेव्काने हयग इने बंदीवासातून कींवा ह्वाल्तीतून पळून जाऊ देणे

          सार्वजनीक आरोग्य,सुरक्षीतता सोय सभ्यता व नीतीमत्ता याना बाधक अशा अप्रधान्वीशइ
कलम २७९- सार्वजनीक रस्त्यावर बेदकारपणे वाहन चालवणे
कलम २९२- अश्लील पुस्तके इ. वी करी करण

        ध्म्स्बंधीच्या अप्रधान्वी श इ
कलम २९५- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानांचे नुकसान करणे कींवा ते अप्वीत्र  करणे
कलम २९५(अ)- कोणत्याही वर्गाच्या धर्माचा कींवा धार्मीक श्रद्धांचा अपमान करून धार्मीक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने कृती करणे
कलम २९८- धार्मीक भावना दुखवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक शब्द उच्चारणे

       मानवी शरीरास व जीवीतास बाधक होणार्या अप्रधावी श इ
कलम २९९- सदोष मनुष्यवध
कलम ३००- खून
कलम ३०२- खुणा बद्दल शीक्षा
कलम ३०४- सदोष मनुष्यवधा बद्दल शीक्षा
कलम ३०४(अ)- ह्य्ग्यीने मृतू स कारण
कलम ३०४(ब)- हुंडा बळी
कलम ३०६- आत्म्हत्तेला अपप्रेरणा देणे
कलम ३०७- खुनाचा प्रयत्न करणे
कलम ३२३- इच्छापुर्वक दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शीक्षा
कलम ३२४- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहच्व णे
कलम ३२५-  इच्छापुर्वक  जबर दुखापत पोहच्व्ण्याब्द्दल शीक्षा
कलम ३२६- घातक ह्त्त्याराने कींवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहच्व णे
कलम ३२६(अ)- असीड इ चा वापर करून  इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे
कलम ३२६(ब)- इच्छापुर्वक असीड फेकणे अथवा फेकण्याचा प्रयत्न करणे
कलम ३२८- अपराध करण्याच्या उद्देशाने वीष इ सहायाने दुखापत करणे
कलम ३३०- कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी , गेलेला  माल परत घेण्यासाठी  इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३२- लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत करणे
कलम ३३६- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणारी कृती
कलम ३३७- इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने दुखापत पोचवणे
कलम ३३८-  इतरांचे जीवीत कींवा व्यक्तीगत सुर्शीतता धोक्यात आणणार्या कृतीने जबर  दुखापत पोचवणे
कलम ३३९- गैर नीरोध / आन्यायाने प्रतीबंध
करणे
कलम ३४०- गैर प्रीरोध/ आन्यायाने कैदेत ठेवणे 
कलम ३४१- गैर नीरोधाबद्दल शीक्षा
कलम ३४२- गैर परीरोधाबद्दल शीक्षा
कलम ३४९- बलप्रयोग
कलम ३५०- फौजदारी पात्र बलप्रयोग
कलम ३५१- हल्ला / हाम्ला
कलम ३५२-  फौजदारी पात्र बलप्रयो गाबद्दल शीक्षा
कलम ३५३-  लोक्सेव्काला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने प्रारुत्त करण्यासाठी फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४- शीरी चा वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(अ)- लैंगीक छ ळ व च छ लाब्द्द्ल शीक्षा
कलम ३५४(ब)- शीरीला वी वस्र करण्याच्याउद्देशाने तीच्यावर हमला कींवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
कलम ३५४(क)- चोरून अश्लील चीत्र्ण करणे
कलम ३५४(ड)- चोरून पाठलाग करणे
कलम ३५९- अप्ण्य्न /मनुश चोरून नेणे
कलम ३६२- अपहरण /प्ल्वुन नेणे
कलम ३६३- अप्ण्य्नाब्द्दल शीक्षा
कलम ३७०- व्यक्तींचा अप्व्यापार करणे
कलम ३७५- बलात्कार
कलम ३७६- बलात्काराबद्दल शीक्षा
कलम ३७७- अनैस्गीक सन्भोक
कलम ३७८ चोरी
कलम ३७९- चोरीबद्दल शीक्षा
कलम ३८०- राहते घर वगैरे ठीकाणी चोरी कलम ३८३- ब्लाद्ग्रह्न /जुल्माने घेणे
कलम ३८४ - ब्लाद्ग्रह्नाब्द्दल शीक्षा
कलम ३९०- जबरी चोरी
कलम ३९१- दरोडा
कलम ३९२- जबरी चोरीबद्दल शीक्षा 
कलम ३९३- जबरी चोरी करण्याचा प्रयतन करणे
कलम ३९५- दरोड्याबद्दल शीक्षा
कलम ३९९- दरोडा घालण्याचा प्रयतन करणे
कलम ४०५- फौज्दारीपात्र न्यास्भंग /विस्वास्घत
कलम ४०६- न्यास्भनगाब्द्दल शीक्षा
कलम ४०९- लोक्सेवाकाने ,सावकार ,ए जंत यांनी आन्यायाने वी सवासघात करणे
कलम ४१०- चोरीची मालमत्ता
कलम ४११- अप्रमानीकपणे चोरीची मालमत्ता  स्वीकारणे
कलम ४१५- ठक्वणूक
कलम ४१७- ठक्वणूक करण्याबद्दल  शीक्षा
कलम ४२०- ठक्वणूक करणे आणी मालमत्ता देण्यास नकार देणे
कलम ४२५- अप्कीर्या
कलम ४२६- अप्किर्य बद्दल  शीक्षा
कलम ४३५- शंभर रुपये पर्यंतच्या कींवा शेतमालाचा १० रु की मतीच्या नुकसान करण्याच्या उद्देशाने स्पोटक पदार्थ अथवा वीस्तव याद्यारे आगळीक करणे
कलम ४४१- फौजदारी पात्र अतीक्रमण कींवा अन्यायाची आगळीक
कलम ४४२- गृह अतीक्रमण कींवा घरा वीषयी आगळीक
कलम ४४३- चोरटे गृह अतीक्रमण
कलम ४४४- रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण करणे
कलम ४४५- घरफोडी
कलम ४४७- फौजदारी पात्र अती क्रमनाबद्दल शीक्षा
कलम ४४८- घर अती क्रमनाबद्दल शीक्षा
कलम ४५२- दुखापत ,हमला ,गैर्नीरोध ,करण्याची प्रुव तयारी करून नंतर गृह अतीक्रमण करणे
कलम ४५४- कारावासाच्या शीक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४५७- कारावासाच्या शीक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी रात्रीच्या वेळी  चोरटे गृह अतीक्रमण कींवा घरफोडी करणे
कलम ४६३- बना वटी करण
कलम ४६५-  बना वटी कर नाबद्दल शीक्षा
कलम ४६८- फसवणूक करण्यासाठी  बना वटी करण करणे
कलम ४९८(अ)- ए खांद्या सी रीच्या पतीने कींवा नातेवाईकाने तीला क्रूर वागणूक देणे
कलम ५०४- शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे
कलम ५०६- फौज्दारीपात्र धाक्दप्त्शा बद्दल शीक्षा
कलम ५०९- वी न्य्भंग करण्याच्या उद्देशाने हावभाव कींवा शब्दोचार करणे
कलम ५११- आजीवन कारावासाच्या कींवा अन्य कारावासाच्या शी क्षेस पात्र असलेले अपराध करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शीक्षा

Tuesday, February 18, 2014

छत्रपती शिवाजी राजे भोसले

छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रिय कुलावंतनुश, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण हिंदू धर्म सोडणार नाही. "

ll जय भवानी ll
ll जय शिवराय ll
����������������
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली.हि बातमी अत्यंत आनंदाची आहे,असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला.ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले.तख्तावरून उठला.त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली.नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली.तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर.आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेक हिंदूने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हव ं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म
समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक हिंदवी स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll
आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद. 
                                             कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड

पुढे पाठवा